इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडमधील कलाकार, त्यांच्या जोड्या हा प्रेक्षकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि इंटरेस्टचा विषय असतो. आमिर – जुही, अक्षय – रविना, शाहरुख – काजोल या अशाच काही लोकप्रिय जोड्या. या जोड्यांना प्रेक्षकांनीदेखील डोक्यावर घेतलं. बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीला एकदा तरी किंग खानसोबत पडद्यावर झळकायचे असतेच. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शाहरुख खान हा रोमँटिक हिरो म्हणून लोकप्रिय आहे. जगभरात शाहरुखचे चाहते आहेत. मात्र याच शाहरुखला बघून अभिनेत्री जुही चावला त्याच्याबरोबर काम करायला घाबरत होती. स्वतः जुहीनेच याची माहिती दिली आहे.
जुही चावल्याने सुरुवातीच्या काळात आमिर खानसोबत काम केले. काही चित्रपटातच तिने आपली ओळख निर्माण केली. एका मुलाखतीत तिने सांगितले की, ‘मी पहिल्यांदा जेव्हा शाहरुखला बघितले तेव्हा याच्यासारखा सावळा, केस वाढलेला मुलगा हा चित्रपटाचा हिरो असू शकतो का, असाच विचार माझ्या मनात आला. पण तोवर मी चित्रपट स्वीकारला होता. पण काम केल्यानंतर मात्र शाहरुख खूप छान माणूस असल्याचे लक्षात आले.
शाहरुख – जुहीने ‘डर’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. शाहरुखची यात नकारात्मक भूमिका होती. यानंतर ‘येस बॉस’, ‘डुप्लिकेट’, ‘फिर भी दिल हैं हिंदुस्थानी’ या चित्रपटात एकत्र काम केले. याशिवायचं दोघे आयपीएलमधील ‘कोलकाता नाईट रायडर’ या संघाचे मालक होते. शाहरुख सध्या ‘जवान’, ‘पठाण’ या चित्रपटांवर काम करत आहे. तो शेवटचा ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात त्याने पाहुणा कलाकार म्हणून हजेरी लावली होती. त्याचा ‘पठाण’ २५ जानेवारी २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे. हा चित्रपट हाय-ऑक्टेन अॅक्शन फिल्म असल्याचं म्हटलं जात आहे.
Actress Juhi Chawla on Actor Shahrukh Khan