इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले की, पहिले काम असते ते म्हणजे मुंबईत एखादे घर घेणे. सध्याची सगळ्यात चर्चेत असलेली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने यादृष्टीने पहिले पाऊल टाकत मुंबईत आलिशान घर खरेदी केले आहे. मुंबईच्या पाली हिलमध्ये तिने आलिशान घर खरेदी केलं आहे. अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर अल्पावधीतच जॅकलीनने कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या मात्र जॅकलिन सातत्याने तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणामुळे मध्यंतरी ती चांगलीच चर्चेत होती. आता मात्र ती तिच्या नव्या घरामुळे चर्चेत आली आहे.
पाली हिल परिसरात खर्डी केले घर
पाली हिल येथील एका पॉश भागात जॅकलीनने हे घर घेतलं असून लवकरच ती कपूर कुटुंबाची शेजारी होणार आहे. जॅकलीनचं हे नवीन खर वांद्रे पश्चिम येथे आहे. तिच्या घराशेजारीच रणबीर कपूर आणि करिना कपूर यांचे घर आहे. या भागात अनेक बॉलिवूड कलाकारांची घरे आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी जॅकलीनने खरेदी घराची इमारत दाखवली आहे.
जॅकलिनच्या नवीन घरात काय?
पाली हिल येथील नवरोज इमारतीमध्ये जॅकलीनने नवीन घर खरेदी केलं आहे. तिचं नवीन घर १ हजार ११९ चौ. फूट आहे. जॅकलीनच्या या इमारतीतील सगळी घरे ही आलिशान आहे. तीन आणि चार बीएचके अशी ही घरे आहेत. यांची किंमत देखील १२ कोटी रुपयांपासून पुढे आहे. विशेष म्हणजे या घरातच क्लब हाऊस, स्विमिंग पूल आणि जिमची सोय आहे.