मुंबई – नवीन जनरेशनच्या नट्यांचे चित्रपटांमध्ये नशीब किती चमकणार याचा तर काही भरवसा नाही, पण त्यांचे फ्युचर प्लान्स मात्र तयार असतात. श्रीदेवीची कन्या जान्हवी कपूर हिनेही आपल्या लग्नाचा प्लान तयार ठेवला आहे. आपले लग्न आलिशान पद्धतिने व्हायला हवे, असे कोणत्याही नटीला वाटेल. पण जान्हवीने अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करण्याचा प्लॅन केला आहे.
जान्हवीने अद्याप चित्रपटांमध्ये पाहिजे तसा जलवा दाखविलेला नाही. पण तिच्या प्रत्येक हालचालींवर, तिच्याशी संबंधित बातम्यांवर फॅन्सची नजर असते. अलीकडेच तिने एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लग्नाचा प्लान सांगून सर्वांचे लक्ष वेधले आहे. मेहंदी, सात फेरे आणि संगीतसाठी तिने तीन वेगवेगळे लोकेशन राहतील, असे सांगितले आहे. दक्षिण इटलीतील एका कॅप्रीमध्ये याचवर बॅचलर पार्टी करण्याची तिची इच्छा आहे.
तिरुपतीला लग्न करण्याला तिने प्राधान्य दिले आहे. श्रीदेवीच्या माहेरी म्हणजे मयलापूरमध्ये संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रम होईल. पण रिसेप्शनमध्ये तिला मुळीच रस नाही. त्यामुळे हा कार्यक्रम तिने आपल्या यादीतून गाळलेला आहे. मोगऱ्याच्या फुलांनी आणि मेणबत्त्यांनी साधी सजावट लग्नात असावी आणि दोन दिवसांत लग्नातले सगळे विधी आटोपण्यावर माझा भर असेल, असे ती स्वतःच सांगते. ‘रुही’मध्ये राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांच्यासोबत जान्हवीची मुख्य भूमिका होती. गुड लक जॅरी, दोस्ताना २ आणि तख्त हे तिचे आगामी चित्रपट आहेत.