मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी आणि ज्येष्ठ दिग्दर्शक बोनी कपूर यांची कन्या जान्हवी हिचा आज वाढदिवस आहे. श्रीदेवीचे असंख्य चाहते हे जान्हवीच्या रुपातच श्रीदेवीला पाहत असतात. शिवाय जान्हवी ही सोशल मिडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. तिच्या वाढिवसानिमित्त तिच्याविषयी जाणून घेऊया…
तिचा लग्नाचा प्लॅन
जान्हवीने अद्याप चित्रपटांमध्ये पाहिजे तसा जलवा दाखविलेला नाही. पण तिच्या प्रत्येक हालचालींवर, तिच्याशी संबंधित बातम्यांवर फॅन्सची नजर असते. अलीकडेच तिने एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लग्नाचा प्लान सांगून सर्वांचे लक्ष वेधले आहे. मेहंदी, सात फेरे आणि संगीतसाठी तिने तीन वेगवेगळे लोकेशन राहतील, असे सांगितले आहे. दक्षिण इटलीतील एका कॅप्रीमध्ये याचवर बॅचलर पार्टी करण्याची तिची इच्छा आहे. तिरुपतीला लग्न करण्याला तिने प्राधान्य दिले आहे. श्रीदेवीच्या माहेरी म्हणजे मयलापूरमध्ये संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रम होईल. पण रिसेप्शनमध्ये तिला मुळीच रस नाही. त्यामुळे हा कार्यक्रम तिने आपल्या यादीतून गाळलेला आहे. मोगऱ्याच्या फुलांनी आणि मेणबत्त्यांनी साधी सजावट लग्नात असावी आणि दोन दिवसांत लग्नातले सगळे विधी आटोपण्यावर माझा भर असेल, असे ती स्वतःच सांगते. ‘रुही’मध्ये राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांच्यासोबत जान्हवीची मुख्य भूमिका होती. गुड लक जॅरी, दोस्ताना २ आणि तख्त हे तिचे आगामी चित्रपट आहेत.
पाळीव कुत्रा
जान्हवीच्या पाळीव प्राण्याचे नाव पांडा आहे. ती स्वतः त्याला फिरायला घेऊन जाते. टी पांडा सोबतचे फोटो सोशल मिडियावर नेहमी शेअर करतांना दिसते. जान्हवी सोबत तिची बहिण ख़ुशी सुद्धा पांडा सोबत टाइम स्पेंड करतांना दिसते.
एवढे घेते मानधन
प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर हिचे प्रचंड चाहते आहेत. खासकरुन श्रीदेवीला चाहते जान्हवीच्या रुपात पाहतात. २०१८ साली जान्हवीने ‘धडक’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. २४ वर्षीय जान्हवी कपूर एका चित्रपटासाठी तब्बल ५ कोटी रुपये मानधन घेते.