मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाच्या विळख्यात बॉलिवूडमधील अनेक तारे अकडले आहेत. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या कन्या खुशी आणि जान्हवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. जान्हवी आणि बोनी कपूर यांना गेल्या वर्षी कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे जान्हवी दुसऱ्यांदा बाधित झाली आहे.
आम्ही दोन्ही बहिणी कोरोना बाधित झाल्याचे जान्हवीने सोशल मिडियात पोस्ट टाकून स्पष्ट केले आहे. बोनी कपूर यांना लागण झालेली नसली तरी त्यांनी घरातच विलगीकरणामध्ये राहत आहेत. खुशी ही जान्हवीची लहान बहिण आहे. जान्हवी ही अतिशय प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मिडियात अतिशय सक्रीय असते. त्यामुळेच चाहते तिच्या सर्वच पोस्ट आणि फोटोंना प्रचंड प्रतिसाद देत असतात.
काही दिवसांपूर्वी जान्हवीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ती बेडवर झोपलेली असून तिने थर्मामीटर तोंडात धरला आहे. आपल्या शरीराचे तपमान ती तपासत असल्याचे त्यात दिसत होते. तर दुसऱ्या एका फोटोत जान्हवी ही खुशी सोबत बेडवर झोपल्याचे दिसते आहे. या फोटो सोबत जान्हवीने लिहिले होते की, ’वर्षाचा तो काळ पुन्हा.’ या पोस्टमुळेही चाहत्यांना कळून चुकले होते की तिला कोरोनाने गाठले आहे. मात्र, आता तिनेच पोस्ट शेअर करुन सर्वांना माहिती दिली आहे.
जान्हवी ही बोनी कपूरच्या प्रोडक्शनच्या ‘मिली’ चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती ‘गुड लक जेरी’ आणि ‘दोस्ताना २’ या चित्रपटांमध्ये सुद्धा काम करत आहे. दुसरीकडे, खुशी कपूरही पदार्पणासाठी सज्ज आहे. झोया अख्तरच्या चित्रपटातून ती बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार आहे.