इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होताना दिसते आहे. तिची फॅशन डिझायनर लिपाक्षी हिची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली. या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच लिपाक्षीचे सर्व बँक डिटेल्सही या अधिकाऱ्यांनी घेतले आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी लिपाक्षीची तब्बल सात तास चौकशी केली. खरं तर लिपाक्षी आणि जॅकलिन या दोघींना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. पोलिसांना या दोघींची समोरासमोर चौकशी कार्याची होती. पण काही कारणांमुळे त्यावेळी लिपाक्षी हजर होऊ शकली नाही. त्यामुळे बुधवारी केवळ लिपाक्षी हिचीच चौकशी करण्यात आली.
सात तास चाललेल्या या चौकशीत लिपाक्षीने अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड केल्याचे समजते. तसेच लिपाक्षीचे सर्व बँक डिटेल्सही गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घेतले आहेत. सुकेश चंद्रशेखर याने लिपाक्षीच्या बँक खात्यात १-२ लाख नव्हे तर तब्बल ३ कोटी रूपये ट्रान्सफर केले होते. हे समोर आल्याने आता लिपाक्षीला आर्थिक गुन्हे शाखेला प्रत्येक पैशाचा हिशोब द्यावा लागणार आहे. दरम्यान, सुकेशने आपल्याला पैसे नेमके कोणत्या कारणासाठी पाठवले होते, ही माहिती देखील लिपाक्षीने अधिकाऱ्यांना दिली आहे.
लिपाक्षीच्या म्हणण्यानुसार, सुकेश चंद्रशेखरने हे सर्व पैसे जॅकलिनच्या डिझायनर कपड्यांसाठी पाठवले होते. सुकेशने पाठवलेले पैसे कुठून आणि कोणत्या मार्गाने आले होते, याबद्दल किंचितही कल्पना आपल्याला नसल्याचे लिपाक्षी हिने या चौकशीत सांगितले. बुधवारी सात तास चाैकशी झाल्यानंतरही गरज पडल्यास लिपाक्षीला परत चाैकशीसाठी बोलावले जाऊ शकते. सुकेश चंद्रशेखरशी संबंधित दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. जॅकलिन फर्नांडिसच नाही तर बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्री सुकेशच्या संपर्कात होत्या. या अभिनेत्रींना सुकेश महागडे गिफ्ट देत असल्याचे उघड झाले आहे.
Actress Jacquline Fernandez Trouble Fashion Designer Enquiry
Delhi Police Crime Investigation Money Laundering
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD