इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वात ऑन स्क्रीन दररोज नवनवीन जोड्या तयार होत असतात. तसेच चित्रपटांमध्ये कलाकारांचे आई – वडीलही वेगळे असतात. अभिनेता अजय देवगणची ऑनस्क्रीन लेक लवकरच आई होणार आहे तर त्याचा ऑनस्क्रीन मुलगा बाबा होणार आहे. गंमत आहे ना. थोडक्यात काय तर अभिनेत्री इशिता दत्त आणि अभिनेता वत्सल शेठ आई – बाबा बनणार आहेत.
‘दृश्यम’ चित्रपटात अजय देवगण यांच्या मोठ्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता गर्भवती आहे. इशिता आणि अभिनेता वत्सल यांनी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. ‘टारझन’ चित्रपटात वत्सलने अजय देवगणच्या मुलाची भूमिका केली होती. अभिनेत्री इशिता दत्ता लवकरच आई होणार आहे. नुकतीच ती मुंबई विमानतळावर दिसली होती. तिथलाच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये इशिता गरोदर असल्याचे दिसते आहे. इशिताने तपकिरी रंगाचा ड्रेस घातला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने पापाराझींना पोजही दिल्या. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सी ग्लोही दिसत होता. इशिताचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.
इशिता आणि वत्सल यांचे लग्न होऊन जवळपास ६ वर्षे लोटली आहेत. लग्नाच्या ६ वर्षांनंतर त्यांना हा पालकत्वाचा आनंद मिळणार आहे. दरम्यान, इशिता व वत्सलने २०१७ मध्ये लग्न केलं होतं. त्यापूर्वी ते एकमेकांना डेट करत होते. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असून एकमेकांबरोबरचे फोटो-व्हिडीओ शेअर करत असतात.
Actress Ishita Dutta Baby Bump Video Viral