विशेष प्रतिनिधी, मुंबई
अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूड यांचे फार जुने कनेक्शन आहे. अनेक चित्रपटांना अंडरवर्ल्ड कडूनच पै सा मिळतो, असे म्हटले जाते. त्यामुळेच अनेकदा अंडरवर्ल्ड डॉन आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या प्रेमाच्या कथा ऐकायला मिळतात. पण ज्या अभिनेत्रींनी अशा डॉनशी लग्न केलं, त्यांचं करिअर तिथेच थांबलं. अशीच एक गोष्ट आम्ही आज सांगणार आहोत. ती आहे हाजी मस्तान आणि अभिनेत्री सोना हिची.
अभिनेत्री सोना हिचा चेहरा अभिनेत्री मधुबाला हिच्याशी मिळताजुळता होता. हाजी मस्तानला मधुबालाशीच लग्न करायचे होते. पण, आपलं प्रेम तो तिला सांगणार याआधीच मधुबालाचे निधन झाले. मधुबालाच्या मृत्यूनंतर तो फारच उदास झाला पण त्यानंतर त्याच्या आयुष्यात आली सोना. सोना जेव्हा चित्रपट सृष्टीत आली, तेव्हा अनेकांना मधुबालाच परतल्याचा भास झाला. चेहऱ्याच्या ठेवणीपासून त्यांच्या हसण्यापर्यंत सगळ्याच गोष्टीं मध्ये सारखेपणा असल्याने चित्रपटसृष्टीतील लोकांनाही धक्का बसला. दोन व्यक्तींमध्ये एवढं साम्य कसं असू शकतं, असाच प्रश्न सगळ्यांना पडला होता.










