इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लाईम लाईटमध्ये राहण्याची सवय असलेल्यांच्या कोणत्याही गोष्टी या चर्चेच्या विषय ठरतात. बॉलीवूडमधील प्रत्येक कलाकार, त्याचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य हे कायमच चर्चेत असते, हे आपल्याला माहित आहेच. सोशल मिडीयावर सक्रिय असणारे कलाकार हे आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची खबरबात चाहत्यांना देत असतात.
अभिनेत्री इलियाना डिक्रुझ ही सध्या असेच अपडेट्स आपल्या चाहत्यांना देते आहे. आपण गरोदर असल्याचे इलियानाने काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सांगितले होते. त्यावरून सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगली होती. आता गरोदरपणातील त्रास सांगणारी एक पोस्ट इलियानाने केली आहे.
काय आहे पोस्टमध्ये?
इलियाना डिक्रूझने गेल्या महिन्यात इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या गरोदरपणाची घोषणा करून आश्चर्याचा धक्का दिला होता. आता इलियाना तिच्या गरोदरपणाचा प्रवासही चाहत्यांसोबत शेअर करते आहे. इलियानाने सोशल मीडियावर आपल्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच आणखी एक फोटो शेअर करत इलियाना गरोदरपणात झोपणे किती अवघड असते, हे सांगते आहे. ती बेडवर पडून झोपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या फोटोसोबत आपला अनुभव शेअर करताना तिने लिहिले की, ‘तुम्हाला झोपायचे असते, पण बाळाने तुमच्या पोटात डान्स करण्याचा निर्णय घेतलेला असतो.’ हे सांगतानाच ती बेबी किकचा अनुभव शेअर करते.
‘प्रेग्नन्ट आहेस, हे ठीक आहे, पण बाळाचा बाबा कोण?’
इलियानाने गरोदरपणाची घोषणा करतातच तिच्या चाहत्यांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट केली आहे. सोशल मिडीयावर तर बाळाचा बाबा कोण अशाच प्रकारचे प्रश्न तिला विचारले गेले. इलियाना अजूनही अविवाहित आहे. काही दिवसांपूर्वी, इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करीत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘कॉफी विथ करण सीझन ७’मध्ये करणने याबद्दल भाष्य केले होते. पण इलियानाने आतापर्यंत त्याच्याशी लग्न केलेले नाही.
Actress Ileana Dcruz Post Pregnancy Suffer Experience