मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बेधडक, स्पष्ट आणि आक्रमक स्वरुपाच्या पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेमध्ये असते. बाई, बुब्स आणि ब्रा या पोस्टमुळे ती देशभरात प्रचंड चर्चिली गेली. ही पोस्ट सोशल मिडीयात वाऱ्यासारखी पसरली होती. तसेच, तिच्या समर्थनार्थ आणि विरोधातही अनेक पोस्ट आल्या होत्या.
आज देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. याचनिमित्ताने तिने फेसबुकवर टाकलेली पोस्ट सध्या सोशल मिडियात गाजते आहे. हेमांगीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मानवी हक्क आणि समाज हितासाठी संविधानात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणायची आमचीच लायकी नाही. जमलं तर माफ करा बाबासाहेब
तिचे हे वेगळे आणि स्पष्ट मत अनेकांना भावले आहे. त्यामुळेच तिच्या फेसबुक पेजवर कमेंटचा पाऊस पडत असल्याचे दिसून येत आहे.
https://www.facebook.com/hemangii.kavidhumal/posts/5576021802417403