मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडमध्ये काम करताना अनेक कलाकारांच्या जोड्या जुळतात आणि ते जन्मभराचे साथीदार देखील बनतात. परंतु काही वेळा या प्रेमामध्ये त्रिकोण निर्माण होतो आणि त्यात विघ्न येते आणि जवळीक होता – होता, दुरावा निर्माण होतो. अशा अनेक घटना आपल्याला या चित्रपट सृष्टीत आढळून येतात.
फिल्म इंडस्ट्री मधील इतिहासात असे प्रेमाचे, दुराव्याचे आणि भांडणाचे देखील अनेक प्रकार घडलेले आहेत. या संदर्भात मागोवा घेतला असता आपल्याला अनेक रंजक गोष्टी माहित होतात. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते संजीव कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या चित्रपटांनी आणि त्यांच्या शैलीने एक जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या फिल्मी करिअरशिवाय दोघेही त्यांच्या अफेअरमुळे खूप चर्चेत होते.
संजीव कुमार हे हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडल्याने तिच्या घरीही लग्नाची मागणी करण्यासाठी गेले. मात्र एका अभिनेत्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. ही दुरावा इतकी वाढली होती की, दोघांचे ब्रेकअपही झाले होते. हा अभिनेता दुसरा कोणी नसून बॉलीवूडचा ‘पहिला सुपरस्टार’ राजेश खन्ना होता. वास्तविक हेमा मालिनी आणि संजीव कुमार ‘त्रिशूल’, ‘कुंवरा बाप’ आणि ‘धूप छां’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. आणि त्यांच्यात प्रेमही निर्माण झाले होते.
संजीव कुमार यांच्या आत्मचरित्रा नुसार असे दिसून येते, राजेश खन्ना यांना माहित होते की, संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांच्यात प्रेम आणि थोडे मतभेदही आहेत. त्यामुळे त्यामुळे त्यांनी दोघांमध्ये खूप गैरसमज निर्माण केले आणि त्यांचे ब्रेकअपही झाले. त्याचे असे झाले की, स्टर्लिंग सिनेमात हॉलिवूड चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित केला होता, जिथे त्यांनी राजेश खन्ना आणि संजीव कुमार या दोघांना बोलावले होते. आयएनटीचे निर्माते बच्चू संपत यांनी राजेश खन्ना यांना शर्मिला टागोरसोबत येण्यास सांगितले होते, तर संजीव कुमार यांनी हेमा मालिनी यांना सोबत येण्यास सांगितले होते.
त्याच वेळी राजेश खन्ना यांना माहित होते की, संजीव कुमार प्रीमियरसाठी येणार आहेत, परंतु संजीव कुमार प्रीमियरला लवकर पोहोचले. काही वेळाने राजेश खन्ना तिथे आले आणि येताना राजेश खन्ना यांनी त्यावेळी हेमा मालिनी यांचा हात धरला होता आणि त्यांच्यासोबत प्रवेश करत आहोत असे भासविले, यामुळे संजीव कुमारला याचा खूप राग आला, तर दुसरीकडे ‘ड्रीम गर्ल’ हेमा देखील या लाडक्या अभिनेत्याला तिथे पाहून आश्चर्यचकित झाली. राजेश आणि हेमा दोघांना एकत्र पाहून संजीव कुमार स्टेजवरून उतरले आणि त्यांच्यापासून दूर प्रेक्षकांमध्ये जाऊन बसले.
शो दरम्यान हेमा मालिनी आणि संजीव कुमार त्यानंतर अनेक दिवस एकमेकांशी बोलतही नव्हते. खुद्द अभिनेता संजीवकुमारच्या मित्रांनीही त्याला या गैरसमजा बद्दल समजावण्याचा प्रयत्न केला की राजेश खन्ना यांनी त्या गोष्टी जाणूनबुजून केल्या आहेत आणि यात ‘ड्रीम गर्ल’ हेमाची काही चूक नाही. पण संजीवकुमारला या गोष्टी सहन झाल्या नाहीत. त्यांच्या मनात गैरसमज असल्याने त्यांनी हेमा मालिनी यांचे म्हणणेही ऐकले नाही. आणि अक्षर दोघांचे ब्रेक-अप झाले परंतु हेमामालिनी आणि राजेश खन्ना यांची मैत्री देखील टिकली नाही. यात फायदा झाला तो धर्मेंद्र यांचा म्हणजे दोघांचे भांडण नि तिसऱ्याचा लाभ असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.