इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एकेकाळी रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका तुफान लोकप्रिय झाली होती. ज्यावेळी केबल किंवा डिश असे कोणतेही वेगवेगळे पर्याय उपलब्ध नव्हते, तेव्हा दूरदर्शनच्या नॅशनल वाहिनीवर रामायण घरघरात हमखास पाहिले जायचे. मालिकेतील व्यक्तिरेखा आणि ती साकारणारे कलाकार हे आजही आठवणीत आहेत. अरूण गोविल यांनी साकारलेला राम आणि दीपिका चिखलियाने साकारलेली सीता आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अनेकजण आजही अरूण गोविल यांना ‘राम’ तर दीपिका चिखलिया हिला ‘सीता’ म्हणूनच ओळखतात. सध्या मात्र सोशल मीडियाच्या जमान्यात दीपिका चिखलिया ट्रोल होताना दिसतेय. होय, दीपिकाचा मॉडर्न अवतार पाहून चाहते भडकले आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.
सोशल मीडियावर सातत्याने काही न काही ट्रेण्ड सुरू असतात. त्यातच रामायणातील ‘सीता’ अर्थात दीपिका चिखलियाने देखील सहभाग घेतला. सोशल मीडियावर तिने एक डान्स व्हिडीओ शेअर केला. यात ती क्रिम कलरचा शरारा घालून ‘ओ मेरे शोना रे’ या गाण्यावर थिरकताना दिसतेय. या गाण्यावर दीपिकाने केलेला डान्स ग्रेसफुल आहे. पण हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. एका आध्यात्मिक भूमिकेत दीपिकाला पाहिलेल्या तिच्या चाहत्यांना तिचा हा अवतार पाहणे जीवावर आले.
अनेकांनी तर दीपिकाला अनफॉलो करण्याची धमकीही दिली. लोकांच्या मनात आजही दीपिका चिखलियाची एक वेगळी इमेज आहे. त्यांना लोक आजही ‘सीता माता’ म्हणून ओळखतात. ‘हे माते! काहे अपनी सम्मानित छवि बदल रही है ढलती उम्र में,” असं एका युजरने तिच्या व्हिडीओवर लिहिलं. कदाचित तुला सीता मातेच्या भूमिकेनं मिळालेला मानसन्मान पुरेसा नाही, अरुण गोविल यांच्याकडून काही शिक, असं एका युजरने कमेंट करत लिहिलं. माताजी, तुला अनफॉलो करतोय. कारण मी तुम्हाला अशा अवतारात बघू शकत नाहीये, असं लिहित एका युजरने आपला संताप व्यक्त केला.
‘रामायण’ मालिकेनंतर दीपिकाने ‘विक्रम वेताळ’, ‘लव कुश’ या मालिकांमध्येही काम केले. १९९१ मध्ये ती राजकारणातही आली. रामायणामुळे मिळालेल्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत तिने १९९१ मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली. पण, काही वर्षांनी तिने राजकारणालाही रामराम ठोकला.
Actress Dipikha Chikhlia Troll in Social Media Video Viral
Dance