इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या किंग खानचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला होता. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काय जलवा दाखवेल हा प्रश्नच होता. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर तो भलताच हिटही झाला. आता तर ५०० कोटी कमावणारा चित्रपट म्हणून त्याची नोंद झाली आहे.
शाहरुख खानचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर रोज वेगवेगळे रेकॉर्ड करतो आहे. लोकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतलाय. शाहरुख खानबरोबर या चित्रपटात दीपिका पदूकोणही मुख्य भूमिकेत आहे. दीपिकाच्या या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे आणि गाण्यात तिने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे प्रचंड वाद निर्माण झाला. तरीही या चित्रपटाने चांगलेच यश पटकावले आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दीपिका पदूकोण आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दीपिकाने चक्क विमानाच्या इकोनॉमी क्लासमधून प्रवास केला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ‘पठाण’ एवढा सुपरहिट ठरवूनही दीपिका इकॉनॉमी क्लासमधून का फिरते, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दीपिका इकॉनॉमी क्लासमधील वॉशरूममध्ये जाताना एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केलं. दीपिकाने स्वतःला लोकांपासून लपवायचा खूप प्रयत्न केला. भगव्या रंगाची टोपी, भगव्या रंगाचं जॅकेट परिधान करूनही लोकांनी दीपिकाला बरोबर ओळखलं आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून काही लोकांनी दीपिकाला चांगलंच ट्रोल केलं आहे. “पठाणमधून पैसे मिळाले नाहीत वाटतं” असा टोमणादेखील काही लोकांनी मारला आहे. तर काहींनी तिचं कौतुक केलं आहे, स्टार्सनीसुद्धा इकोनॉमी क्लासने प्रवास कारायला हवा असं काहींनी म्हटलं आहे. दीपिका पदूकोण आता हृतिक रोशनबरोबर आगामी ‘फायटर’ या चित्रपटात झळकणार आहे.
https://twitter.com/MJ_007Club/status/1626636482739073029?s=20
Actress Deepika Padukon Troll in Social Media