मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडची बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री दीपिका पादुकोणची मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे. लूक आणि अभिनयामुळे ती नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गहराइयां चित्रपटावरूनही ती चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटात दीपिकाचे अनेक रूप पाहायला मिळाले आहेत. यामध्ये ती कधी भावूक, कधी निराश, कधी प्रेमळ आणि तर कधी बदला घेताना दिसली आहे. या चित्रपटात ती बहुतांश विनामेकअप दिसली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दीपिका आणि तिच्या सहकलाकारांनी स्वतःला संपूर्णपणे झोकून दिले. यादरम्यान आपल्या जीवनाशी निगडित एक गुपित तिने शेअर केले आहे. दीपिकाला डॉक्टरांनी एक शस्त्रक्रिया करायचा सल्ला दिला होता. दीपिकाने सांगितले की, तिला एकदा स्तन रोपण करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
दीपिका म्हणाली, की चित्रपटसृष्टीत ती अनेक गोष्टी शिकली आहे. शाहरूख खानचे कौतुक करताना ती म्हणाली, की ते खूपच चांगले माणूस आहेत. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मला उपयुक्त ठरल्या. ज्या व्यक्तींना तू ओळखते, त्यांच्यासोबतच काम कर. तू फक्त चित्रपटातच काम करत नाहीयेस, तू आठवणी तयार करत आहेस. त्यासोबतच काम करताना तुला अनेक अनुभव मिळतील. दीपिकाने शाहरूख खानसोबत चेन्नई एक्सप्रेस आणि ओम शांती ओम या चित्रपटात काम केले आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. प्रत्येक भूमिकेत प्रेक्षकांनी तिला स्वीकारले आहे. ओम शांती ओममधील साधी-भोळी मुलीची भूमिका असो, अथवा चेन्नई एक्सप्रेसमधील विनोदी भूमिका असो, तिने या भूमिका चांगल्या निभावल्या आहेत. अनेक चित्रपटात काम करूनही दीपिका वादापासून दूर राहिली आहे.