इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – घरात चिमुकली पाऊलं येणार म्हटलं की घरातील सगळ्यांचाच उत्साह दुणावतो. अगदी या नऊ महिन्यांमधील आठवणी जपण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठीच हल्ली वेगळं मॅटर्निटी फोटोशूट करून या आठवणी जतन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात सेलिब्रिटी म्हटल्यावर तर विचारायलाच नको. त्यांचं साधं जगणं देखील अत्यंत आरामदायी असतं. मग अशा खास वेळी तर काही विचारायलाच नको. मात्र असं मॅटर्निटी फोटोशूट करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणं अभिनेत्रीला भारी पडलं आहे.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री डेबिना बॅनर्जी लवकरच आई होणार आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. हे फोटो, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. तुम्हाला हे शोभत नाही, असं म्हणत त्यांनी थेट डेबीनाला झापलं आहे.
मूळची बंगालची असलेली अभिनेत्री डेबीना बॅनर्जी हिला ‘रामायण’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अनेक विविधभाषी चित्रपटांमध्ये तिने काम केले. अभिनेता गुरमीत चौधरी बरोबर लग्न केल्यानंतर ही जोडी अनेकदा सोबतच दिसली आहे. डेबिनाला एक मुलगी आहे, तिचं नाव लिएना. त्यानंतर आता पुन्हा डेबिना आणि गुरमीत चौधरी यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. या आनंदात डेबिनाने मॅटर्निटी फोटोशूट केलं. ते आपल्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. मात्र हे शूट करताना तिने बिकिनी आणि हाय हिल्स घातल्याने ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
या पोस्टवर कमेंट करत तुम्हाला हे शोभत नाही, ही आपली संस्कृती नाही, असे म्हणत नेटकऱ्यांनी डेबिनाला धारेवर धरलं आहे. तर दुसरीकडे पहिली मुलगी अवघ्या काही महिन्यांची असताना दुसरं बाळ म्हणून दुसऱ्या गर्भधारणेपूर्वी तुम्ही लिएनाला थोडा वेळ दिला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? असे एका युझरने तिला विचारले. त्यावर डेबिनाने देखील या नेटकऱ्यांना प्रश्न विचारला. डेबिना म्हणते, जेव्हा काहींना जुळी मुलं होतात, तेव्हा ते काय करतात?” असा प्रश्न विचारून जरी तिने वेळ मारून नेली असली तरी डेबिनाचं वागणं बरं नव्हे असं म्हणत नेटकरी मात्र भलतेच संतापले आहेत.
Actress debina bonnerjee Hot Bikini Maternity Photo shoot