इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – बॉलीवूडमध्ये सध्या अनेक अभिनेत्रींच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या येत आहेत. बॉलीवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी बिपाशा बसू ही देखील लवकरच आई होणार आहे. सध्या ती कोणत्याही प्रोग्रॅममध्ये दिसत नसली तरी सोशल मिडीयावर ऍक्टिव्ह असते. नुकतेच तिने आपले प्रेग्नन्सी फोटो शूट केले आहे. जे सोशल मीडियावर चांगलेच गाजते आहे. आपल्या इन्स्टा अकाऊंटवर तिने हे फोटोज शेअर केले आहेत. यात तिच्यासोबत तिचा पती करण सिंग ग्रोव्हर देखील आहे.
‘जिस्म’ चित्रपटानंतर जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांच्या नावाची चांगलीच चर्चा होती. हे दोघे लग्न करणार असल्याचीही बातमी होती. पण कुठेतरी काहीतरी फिस्कटलं आणि हे दोघे वेगळे झाले. त्यांनंतर बिपाशाने करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्न केले. बिपाशा आणि करण यांची लव्ह स्टोरी इंटरेस्टिंग आहे. ‘अलोन’ चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघे भेटले. मग नेहमीप्रमाणे भेटींचे रूपांतर आधी मैत्री आणि नंतर प्रेमात झाले. लग्न करण्याचा निर्णय घेत 2016 मध्ये त्यांनी लग्न केले. विशेष म्हणजे करण सिंगचे हे तिसरे लग्न आहे.
आता लग्नाच्या सहा वर्षांनी बिपाशा आई होणार आहे. आज तिचे वय आहे 43 वर्षे. वयाच्या या टप्प्यावर आलेली प्रेग्नन्सी ती एन्जॉय करते आहे. हाच आनंद साजरा करण्यासाठी तिने नुकतेच फोटो शूट केले आहे. आपल्या स्वभावानुसार तिने हे फोटो शूट देखील बोल्ड केले आहे. सोनेरी रंगाच्या शिमरी कपड्यांमध्ये बिपाशाने हे शूट केले आहे. या बोल्ड फोटो शूटवर नेहमीप्रमाणे दोन वेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी तिच्या या अंदाजाचे कौतुक केले आहे, तर काहींनी नाकं मुरडली आहेत.
या अवस्थेत अशा शूटची गरज आहे का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. पण हे काही असलं तरी बिपाशा आणि करण मात्र खूपच आनंदात आहेत. त्यांचा हा आनंद या शूटमध्ये देखील झळकतो आहे. 4 तासांत जवळपास लाखभर लोकांनी हे फोटो लाईक केले आहेत.
या फोटोंसोबत बिपाशाने एक पोस्टही लिहिली आहे. आतापर्यंत आम्ही दोघांनी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. लवकरच आमच्या प्रेमाचे प्रतीक असलेले आमचे बाळ या जगात येणार आहे. दोघांचे तिघे होत असल्याचा आम्हाला खूप आनंद आहे, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. यासोबतच तिने चाहत्यांच्या सदिच्छा आणि त्यांनी केलेल्या प्रेमाच्या वर्षावाबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत.
Actress Bipasha Basu Bold Pregnancy Photoshoot