मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू हिने अनोख्या अंदाजात ४३वा वाढदिवस साजरा केला. तिच्या असंख्य चाहत्यांनी आणि मित्र परिवाराने तिला शुभेच्छा दिल्या. परंतु सगळ्यात स्पेशल सरप्राईज हे तिच्या पतीने म्हणजेच करणसिंग ग्रोवरने दिले. बिपाशाने हा आनंदाचा क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केला. बिपाशाने शेअर केलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, करणसिंग ग्रोवरने तिला मध्यरात्री सरप्राईज दिले आहे. एका व्हिडीओ मध्ये ती गुलाबी आणि सोनेरी फुग्यांमध्ये नाचतांना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ती केक कट करतांना दिसत आहे.
यशस्वी मॉडेलिंग नंतर बिपाशाने थ्रिलर अजनबी (२००१) मधील मुख्य भूमिकेद्वारे चित्रपटात पदार्पण केले. ज्यासाठी तिला सर्वोकृष्ट पदार्पनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. राज (२००२), जिस्म (२००३), कॉर्पोरेट (२००६), नो एंट्री (२००५), फिर हेरा फेरी (२००६) आणि ऑल द बेस्ट (२००९), धूम २ (२००६), रेस (२००८) आणि राज थ्रीडी (२०१२) सारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका केली आहे. बिपाशाने शेवटचा चित्रपट २०१५ मध्ये केला. अलोन या हॉरर चित्रपटात ती शेवटची मोठ्या पडद्यावर दिसली होती. मात्र, २०२० मध्ये तिने डेंजरस वेब सिरीजद्वारे ओटीटी सारख्या व्यासपीठावर पदार्पण केले आहे.