इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी शरीराकडे आणि आरोग्याकडे खूप लक्ष देत असल्याचे दिसते. ‘मैने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्री देखील मागे नाही. अभिनेत्री भाग्यश्री नेहमीच सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना वेगवेगळ्या फिटनेस टिप्स देत असते. कधी डाएटबाबत माहिती देते तर कधी एखादा व्यायाम सांगते. ती तिच्या व्यायामाबाबत अतिशय पर्टिक्युलर आहे. त्यामुळेच वयाची पन्नाशी आली, तरीही ती फारच अॅक्टीव्ह आहे. तिने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यात ती केटलबेल स्विंग हा व्यायाम करताना दिसते आहे. हा व्यायाम केल्यामुळे वजन तर कमी होतेच, पण कॅलरी जळून उर्जा मिळण्यासाठी तसेच शारिरीक क्षमता वाढविण्यासाठी या व्यायामाचा उपयोग होतो.
केटलबेल हा व्यायाम प्रकार पूर्वी प्रामुख्याने रशियामध्ये केला जायचा. तिथेही रशियन सैनिक अशा पद्धतीचा व्यायाम करायचे. या व्यायामाचे फायदे लक्षात घेता, अनेक जणांनी तो व्यायाम शिकून घेतला. अमेरिकेतही आता हा व्यायाम बराच प्रचलित झाला असून भारतातही आता या व्यायामाची उपकरणे मिळतात. हा व्यायाम केल्यामुळे वजन तर कमी होतेच, पण कॅलरी बर्न होऊन उर्जा मिळण्यासाठी तसेच शारिरीक क्षमता वाढविण्यासाठी या व्यायामाचा उपयोग होतो. भाग्यश्रीने या व्यायामाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या पोस्टमध्ये भाग्यश्री म्हणते की हा व्यायाम दिसायला जेवढा सोपा आणि सहज वाटतो, तसा मुळीच नाही. तुम्ही जेव्हा तो प्रत्यक्ष करता, तेव्हाच तो किती अवघड आहे, याची जाणीव होते. हा व्यायाम असा आहे जो शिकायला थोडा वेळ लागतो, पण एकदा तो करता आला की मग कॅलरी बर्न करण्यासाठी हा व्यायाम सुपर इफेक्टीव्ह ठरतो. मांड्या, हिप्स, कंबर आणि पाठ यांच्या स्नायूंसाठी हा व्यायाम परफेक्ट असून याठिकाणी अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पण हा व्यायाम तज्ज्ञांकडून शिकून घेतल्याशिवाय कधीही करू नका. कारण स्वतःच्या मनाने व्यायाम करायला जाल तर कंबरेला दुखापत होऊ शकते. पण आज पन्नाशीतही भाग्यश्री फिट आहे हे तिच्या व्यायामाचे फलित आहे हे कुणीच नाकारू शकत नाही.
Actress Bhagyashree Kettlebell Swing Exercise Benefits
Health Entertainment