इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टीचे नुकतेच लग्न झाले. अथिया तिच्या स्टाइल सेन्ससाठी ओळखली जाते. नुकतीच ती मुंबईतील एका कार्यक्रमात दिसली. यावेळी तिने पांढरा गाऊन परिधान केला होता. त्या पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये अथिया खूपच सुंदर दिसत होती. असे असले तरी काहींना तिचा लूक आवडला नाही. आणि हेच तिच्या ट्रोल होण्याचं कारण झालं आहे.
काही युजर्सनी तर ती बुरखा घालून आल्याचंही म्हटले आहे. अथियाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी तिला कमेंट्स करून ट्रोल करत आहेत. अथिया शेट्टी पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन घालून या कार्यक्रमात आली होती. पापाराझींसमोर तिने पोज दिली. तसं तर तिच्या ड्रेसमध्ये ट्रोल करण्यासारखं काही नव्हतं, पण ती ज्या पद्धतीने एक्सप्रेशन देत होती, त्यावरून लोकांनी तिच्या लुकची खिल्ली उडवली आहे. तर काहीजणांनी तिचे पती केएल राहुलचे नाव घेऊनही तिला ट्रोल करत आहेत.
अथिया शेट्टीच्या या व्हिडीओवर युजर्स कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, ‘तिचा चेहरा सुनील शेट्टीसारखा आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर मुलींसारखे नाजूक भाव दिसत नाहीत. तिला पाहिल्यावर ती मुलगी असल्यासारखं वाटत नाही.’ तर दुसरा एक म्हणतो, ‘काय बोलावे कळत नाही. हाईट, बॉडी चांगली आहे, पण तिला मोजकेच कपडे शोभतात. तिने साडी आणि सलवार सूट परिधान करावे, त्यात ती चांगली दिसते.’ या इव्हेंटला श्वेता बच्चन, अनन्या पांडे, सोनम कपूर, खुशी कपूर, कनिका कपूर, रेखा, विराट कोहली, अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
Actress Athiya Shetty Troll Social Media