इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिंदी चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या सगळ्याच अभिनेत्रींचं रूप हे साधं, सोज्ज्वळ असं होत. त्या रूपातही त्यांचे चाहते बरेच होते. पण, काळ बदलत गेला तसे चित्रपटसृष्टीतही अनेक बदल झाले. आणि अभिनेत्रींचं रुपडंही बदललं. मात्र, आताच्या काळातील महिलांचे बदललेले रुपडे ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना काही फारसे रुचलेले नाही. विशेषतः लग्न समारंभात घातल्या जाणाऱ्या पाश्चिमात्य कपड्यांवर त्यांनी टीका केली आहे. तसेच, पठाण चित्रपटाली बिकीनी शूटवरही त्यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “हा गोंधळ बिकिनीबद्दल नव्हता, तर त्याच्या रंगावर होता. मला वाटते की आपण आपले मन गमावत आहोत. आपण संकुचित होत चाललो आहोत, जे चुकीचे आहे. बॉलिवूड नेहमीच सॉफ्ट टार्गेट राहिले आहे,”
गोव्यातील ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही त्यांनी हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी स्त्रियांच्या सध्याच्या वेशभूषेबद्दल टिप्पणी केली. याविषयी आशा पारेख म्हणतात की, “सध्या पाश्चात्य संस्कृतीचं उदात्तीकरण फारच वाढलं आहे. हे सारं माझ्या समजण्यापलीकडे आहे. मुली चक्क गाऊन घालून लग्नसमारंभाला येतात. आपल्याकडे अशा कार्यक्रमांना घालायला पारंपरिक कपड्यांचे प्रकार कमी आहेत का, असा सवालही त्या करतात. तुम्हाला साडी नेसायची नसेल, तर घागरा चोली, सलवार कुर्ता असे अनेक प्रकार आहेत, ते वापरता येतील, असे मतही त्यांनी मांडले आहे.
या सगळ्याचा संबंध त्यांनी चित्रपटांशी जोडला आहे. त्या म्हणतात, “आजच्या काळात पारंपरिक कपडे का घातले जात नाहीत? कारण आजची मुलं – मुली पडद्यावरील कलाकारांचं अनुकरण करत आहेत. आपण जाड आहोत की बारीक याचा जराही विचार न करता कलाकार जे कपडे वापरतात त्यांचं अनुकरण सध्याच्या मुली करत आहेत. ते कपडे आपल्याला शोभतील का याचा जराही विचार त्या करत नाहीत. पाश्चिमात्य संस्कृतीचं हे उदात्तीकरण पाहून मला प्रचंड दुःख होतं”, असं त्या सांगतात.
ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी अनेक वर्ष बॉलीवूडवर राज्य केलं. नुकताच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कर देऊन गौरविण्यात आलं. कोणत्याही चित्रपटासाठी प्रत्येक अभिनेत्याची पहिली पसंती आशा पारेख यांनाच असायची. अभिन्याबरोबरच त्यांनी त्यांच्या बहारदार नृत्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. १९९० च्या अखेरीस आशा पारेख यांनी निर्माती आणि दिग्दर्शक म्हणूनही कारकीर्द गाजवली. २०१७ मध्ये प्रसिद्ध चित्रपट समीक्षक खालिद मोहम्मद यांच्यासह सहलेखन केलेले त्यांचे ‘द हिट गर्ल’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले होते.
Actress Asha Parekh Reaction on Pathan Movie Bikini Shoot
Bollywood Cloths