इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘शेवंता’ म्हणून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेपासून ती प्रकाशझोतात आली. तिचे चाहते देखील अनेक आहेत. सध्या अपूर्वा मराठी ‘बिग बॉस’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. त्यातीलही तिचे अनेक किस्से समोर येत आहेत.
आता ‘बिग बॉस’मध्ये चार चॅलेंजर्स आले आहेत. त्यांच्यासोबतही या स्पर्धकांचे सूर जुळताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये अपूर्वा नेमळेकर स्पर्धक म्हणून सहभागी झाली. या कार्यक्रमाच्या पहिल्या आठवड्यापासूनच अपूर्वाने घरात राडा करण्यास सुरुवात केली. विकास सावंत, किरण माने, अमृता धोंगडे या सदस्यांशी तिचं भांडण झालं. सध्या ती या शोमुळे चांगलीच चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा तिच्या नवीन विधानाने अपूर्वा चर्चेत आली आहे. अपूर्वा सध्या सिंगल आहे. तिला आता जोडीदाराची गरज भासत असून त्यासाठी स्वयंवर करण्याची इच्छा तिने नुकतीच बोलून दाखवली आहे. अपूर्वा तिच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत राहिली आहे. अपूर्वा सध्या सिंगल असल्याने यावेळी तिने ‘बिग बॉस’च्या घरात एक इच्छा बोलून दाखवली. सध्या चॅलेंजर म्हणून राखी सावंतने ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री केली आहे.
वेगवेगळ्या टास्क अंतर्गत सदस्यांमध्ये मनमोकळ्या गप्पा होताना आपण पहातो. अपूर्वासह अमृता देशमुख किचनमध्ये काम करत असताना राखी त्यांच्याशी गप्पा मारत असते. यावेळी अपूर्वा मी सिंगल आहे असं म्हणते. तर अमृताही मी सिंगल असल्याचं सांगते. मात्र, अमृता सिंगल आहे हे अपूर्वाला मान्य होत नाही. अमृता म्हणते, “बाहेर जाऊन बघितलंस तर कळेल, माझ्यासाठी मुलांचा दुष्काळ आहे. पण शेवंता – शेवंता करणारे खूप आहेत.” तर अपूर्वा म्हणते, “ते सगळे शेवंता शेवंता करणारे आहेत. माझ्या खऱ्या आयुष्यात कोणी नाहीच.” या दोघींचं बोलणं ऐकून राखी म्हणते, “अमृता तुझं स्वयंवर आहे. तुला लग्नासाठी मुलगा पाहिजे ना…” यावर माझं स्वयंवर का नाही, असा प्रश्न अपूर्वा राखीला विचारते.
त्यानंतर अपूर्वा राखीला म्हणते की, “कलर्स वाहिनीला माझं स्वयंवर करायला सांग.” यावर अमृता म्हणते, “आधी माझं स्वयंवर. मी लग्नासाठी एक मुलगा निवडते. दुसरा मुलगा जो असेल त्याची निवड तू कर.” यावर अपूर्वा म्हणते, “नवरा म्हणजे भाजीपाला आहे का?” थोडक्यात काय तर अपूर्वाने यावेळी तिला स्वयंवर करायची इच्छा बोलून दाखवली. तसेच ती सिंगल असल्याचंही म्हटलं आहे.
आठ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अपूर्वाचे लग्न झाले. एवढे दीर्घ काळ असलेले हे नाते लग्नानंतर मात्र काही महिनेच टिकले. आणि अपूर्वाचा घटस्फोट झाला. आणि आता अपूर्वा नेमळेकरला स्वयंवर करायचे आहे. ही इच्छा तिने ‘बिग बॉस’च्या मंचावरून बोलून दाखवली आहे.
Actress Apurva Nemlekar Will After Divorce