मुंबई – अनुष्का शर्मा सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. आपल्या आयुष्यातील छोट्यातील छोटी गोष्टही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तगडे फॅन फॉलोइंग असलेली अनुष्का सध्या पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत – इंग्लंड सामने सुरू होण्यापूर्वी ते दोघे तिथे क्वालिटी टाइम घालवत आहेत. याच दौऱ्यातील आपले काही खास फोटो अनुष्काने चाहत्यांसाठी इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत.
क्रॉप टॉप आणि डेनीमवर क्रॉप जॅकेट घातलेली अनुष्का या फोटोंमध्ये अत्यंत सुंदर दिसते आहे. सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी हिने हे फोटो काढले आहेत. अनुष्काने एकूण 5 फोटो शेअर केले आहेत. या पाचही फोटोंमध्ये तिचा लूक एकदम गॉर्जस आहे.
या फोटोंमध्ये अनुष्काने घातलेले जॅकेट तिला खूप सूट होते आहे. पण ते जर तुमच्या कलेक्शनमध्ये हवे असेल तर मात्र खिशाला चाट बसणार हे नक्की. कारण या जॅकेटची किंमत आहे 76 हजार 228 रुपये. तर यात तिने जी पर्स घेतली आहे, ती घेण्याचा विचार तर आपण क्वचितच करू शकतो. ही पर्स आहे 3200 डॉलर्सची. भारतीय रुपयांत सांगायचं तर तब्बल 2 लाख 38 हजार 213 रुपयांची. लुईस वीट्टनची ही पर्स असून ती व्हर्जिल अब्लोह यांनी डिझाइन केली आहे.