सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
टीव्ही अभिनेत्री ‘पवित्र रिश्ता’ फेम अंकिता लोखंडे हिचा गेल्या महिन्यात मुंबईत एक भव्य विवाहसोहळा पार पडला. तिने 14 डिसेंबर रोजी तिचा प्रियकर,बिजनेसमन विक्की जैन याच्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाआधी संगीत, कॉकटेल, मेहेंदी आणि हळदीसह अनेक प्री-वेडिंग फंक्शन्स होती. या जोडप्याने त्यांच्या लग्नानंतर अनेक पार्ट्याही आयोजित केल्या होत्या. अलीकडेच, अंकिता लोखंडे नि सांगितले की तिने फक्त ” पार्टी आणि पैसे खर्च करण्यासाठी” लग्न केले.
अंकिता लोखंडेने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या मणिकर्णिका या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. मात्र, त्यानंतर ती चित्रपटांमधून गायब झाली. अंकिता चित्रपटातून गायब का झाली असे विचारले असता ती म्हणाली, ‘कारण मी लग्न करत होते.’ ती म्हणाली, ‘मला माझ्या मना प्रमाणे चित्रपट हवे आहेत, मी फक्त चित्रपट करण्यासाठी चित्रपट करू शकत नाही. मला माझ्या टाईप चे चित्रपट करायचे आहेत आणि माझ्या आवडीची पात्रे साकारायची आहेत.
अंकिता लोखंडेने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रियकर विकी जैनसोबत लग्न केले. लग्नानंतर आयुष्य कसे बदलले, असे विचारले असता अंकिता लोखंडे म्हणाली, ‘लग्नानंतर माझ्या आयुष्यात काहीही बदल झाले नाही. विकी आणि मी खूप दिवसांपासून मित्र आहोत. आणि आम्ही नेहमी चिल झोन मध्ये राहतो.’ विकी जैनबद्दल अंकिताने लिहिले की, ‘विकी ही अशी व्यक्ती आहे ज्याने मला प्रत्येक परिस्थितीत साथ दिली आहे. त्याला जोडीदार म्हणून मिळाल्याने मी धन्य झाले. जेव्हा कामाचा अंकिता लोखंडे म्हणाली, ‘मी, पार्टी करता यावी म्हणून लग्न केले. तुम्हाला माहिती आहे, लग्नानंतर आम्ही फक्त तीन दिवस पार्टी केली.’
अंकिता म्हणाली,, ‘आम्हाला फक्त पैसे उडवायचे होते. मला वाटत नाही काही बदल झाला आहे. शेवटी लोकांना काय हवंय? मला माहित नाही. माझ्या मते काहीही बदलले नाही. खरं तर, हे सर्व आपण कशी दृष्टीकोनाने पाहता यावर अवलंबून असते. काही लोक या गोष्टी खूप गांभीर्याने घेतात. लग्न म्हणजे जबाबदाऱ्या पार पाडणे नव्हे तर मोकळेपणाने आयुष्य जगणे. असे अंकिताने एका मुलाखतीत सांगितले.