गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

…म्हणून अभिनेत्री अमृता सुभाषने घेतला मूल होऊ न देण्याचा निर्णय

नोव्हेंबर 22, 2022 | 5:31 am
in मनोरंजन
0
Amruta Subhash 1

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या अभिनयाने ओळखली जाणारी गुणी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. गेले काही दिवस अमृता सातत्याने चर्चेत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणणे ‘वंडर वुमेन’ हा तिचा चित्रपट. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तिने ती अर्थात चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा गरोदर असल्याची पोस्ट टाकली होती. ओघानेच त्यानंतर सोशल मीडियावर त्याची चिक्कार चर्चा रंगली. मग अमृताने स्वतःच ‘सारं काही प्रमोशनसाठी’ असं काहिर केलं, आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला. तर आज पुन्हा ही चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे, मूल होऊ न देण्याचा अमृताने घेतलेला निर्णय.

या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती गेले काही दिवस गुंतलेली होती. यादरम्यां एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत अमृता सुभाषने आपला हा निर्णय जाहीर केला. या निर्णयात नवरा संदेश कुलकर्णी याचीही साथ असल्याचे ती आवर्जून सांगते.शिवाय या निर्णयामागचे कारणही स्पष्ट करते.

अमृताची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘वंडर वुमन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मातृत्वाचे सुख उशिरा पदरात पडणाऱ्या जयाची भूमिका तिने या चित्रपटात साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत “लग्नानंतर काही महिन्यांनीच गोड बातमी कधी देणार असा प्रश्न अनेकींना विचारण्यात येतो. याकडे तू कसं बघतेस?” असा प्रश्न तिला विचारला गेला. या प्रश्नाचं उत्तर देताना तिने मूल न होऊ देण्याच्या त्यांच्या निर्णयामागची कारणं स्पष्ट करत आजचा काळ कसा बदलला आहे यावरही भाष्य केलं.

अमृता म्हणते, “आता काळ बदलतो आहे. मुलं आवडतात पण तरी मूल होऊ न देण्याचा निनी घेणारी अनेक जोडपी आहेत. मुलं आवडणं आणि ती वाढवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही दोघंही आमच्या आमच्या करिअरमध्ये खूप व्यग्र आहोत. त्यामुळे आम्ही बाळाला वेळ देऊ शकू का? आणि त्याला न्याय देऊ शकू का? असा विचार आम्ही नेहमीच करतो. याचं उत्तर नकारार्थी असल्याने, आम्ही ठरवलं मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला.

आमच्या कामावर आमचं खूप प्रेम असल्यामुळे ते आम्ही सोडू शकत नाही. तसंच कामावरच्या प्रेमामुळे बाळाकडे दुर्लक्ष करणंही योग्य नाही. मात्र, आम्हाला मुलं आवडत नाहीत असा याचा अर्थ होत नाही. आमच्या मित्र-मैत्रिणींच्या मुलांवर मी खूप प्रेम करते. मी माझी काम करून मला वेळ असेल तेव्हा त्यांच्याशी खेळायला जाऊ शकते. मी करिअरकडे ज्या पद्धतीने पाहते त्यात बाळाचं संगोपन मला करता आलं असतं का असा प्रश्न मला पडतो. बाळ आवडणं आणि त्याला जन्म देऊन त्याचं चांगलं संगोपन करणं यासाठी खूप एनर्जी लागते. ही एनर्जी आमच्यासारख्यांना इतर गोष्टींमध्ये वापराविशी वाटते.” आज काळही बदलला आहे. एक बाई तिच्या कामामुळे पूर्ण असू शकते किंवा तिच्या असण्याने ती पूर्ण असू शकते. त्याच्यासाठी तिचं लग्न झालं, तिला मूल झालं म्हणजे तिला पूर्णत्व आलं, असं काही नाही,” असंही अमृता म्हणते.

View this post on Instagram

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash)

Actress Amruta Subhash on Child Married Life

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येत्या ३० नोव्हेंबरला प्रतापगडावर होणार हे सर्व जय्यत कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती

Next Post

भारतात दुपारी आणि सायंकाळीच का होतात अपघात? बघा, हा अहवाल काय सांगतो…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
IMG 20251008 WA0370
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार….

ऑक्टोबर 9, 2025
महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
Next Post
संग्रहित फोटो

भारतात दुपारी आणि सायंकाळीच का होतात अपघात? बघा, हा अहवाल काय सांगतो...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011