इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आलिया भट्ट, रणबीर कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपटात नुकताच प्रदर्शित झाला. बॉयकॉटचा ट्रेंड असताना देखील या चित्रपटातने चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी जमवण्यात यश मिळवले. यामुळे चित्रपटाची संपूर्ण टीम यशाचा आनंद साजरा करत आहे. आलिया भट्ट सध्या गरोदर आहे. लवकरच ती आई होणार आहे. तत्पूर्वी आलियाच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी आहे. एस.एस. राजमौलींच्या आगामी सिनेमात आलियाची वर्णी लागली आहे.
राजमौलींच्या ‘आरआरआर’ या सिनेमात आलिया दिसली होती. या चित्रपटात आलियाची भूमिका फार काही मोठी नव्हती. पण या छोट्याशा भूमिकेतही तिने जीव ओतला होता. राजमौली तिच्या कामावर फिदा झाले आहेत आणि आता त्यांनी तिला आपल्या नव्या चित्रपटासाठी साईन केल्याचं कळतंय. साऊथच्या चित्रपट सृष्टीतले ‘बाहुबली’ अशी ओळख असणाऱ्या एस.एस.राजामौलींच्या आगामी चित्रपटामध्ये आलिया साऊथ सुपरस्टार महेश बाबूंसह दिसणार आहे. समीक्षक उमेर संधू यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
‘एस.एस.राजामौलींच्या आगामी ‘एसएसएमबी २९’ या चित्रपटामध्ये आलिया भट आणि महेश बाबू एकत्र काम करणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण आलियाच्या बाळाच्या जन्मानंतर सुरू होईल,’ असं त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. आलियाची यंदा डिसेंबर अखेरीस डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर ती राजमौलींच्या चित्रपटात बिझी होणार आहे. साहजिकच तिचे चाहते या बातमीनं खुश आहेत. पहिल्यांदा महेश बाबू आणि आलियाची जोडी पडद्यावर पाहायला मिळणार. अर्थात आलिया वा राजमौलींनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
आलियाने काही महिन्यांपूर्वीच हॉलिवूड चित्रपटाचं शूटींग पूर्ण केलं. ‘हार्ट ऑफ स्टोन’ नावाचा हॉलिवूड सिनेमा हातावेगळा केल्यानंतर ती लगेच ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनमध्ये बिझी झाली होती. आलियासाठी २०२२ वर्ष तिच्यासाठी प्रचंड लकी ठरलं आहे. या वर्षात तिचे ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘आरआरआर’, ‘डार्लिंग्ज’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ असे सिनेमे प्रदर्शित झालेत. या सर्व सिनेमांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सध्या आलिया टॉपची हिरोईन आहे. वर्षभरात १०० कोटींची कमाई करणाऱ्या तीन चित्रपटोंमध्ये काम करणारी ती पहिली अभिनेत्री आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये तिने रणबीर कपूरशी लग्नगाठ बांधली. यानंतर लग्नाला उणेपुरे दोन महिने होत नाही तोच तिने प्रेग्नंसीची घोषणा केली.
Actress Alia Bhatt Upcoming Film
Rajamaouli Movie Entertainment Bollywood
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/