मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्त्रियांना जवळपास रोजच लैंगिकतावादी टिप्पण्यांना तोंड द्यावे लागते. त्यांची अंतर्वस्त्रे असोत किंवा मासिक पाळी, याबद्दल नेहेमीच उघडपणे बोलणे टाळले जाते. नेमक्या याच मुद्द्यावर अभिनेत्री आलिया भट्ट हिने प्रश्न उपस्थित केला आहे. स्त्रियांची अंतर्वस्त्रे दिसली तर त्यावर आक्षेप घेण्यासारखे काय आहे, असा रोखठोक सवाल तिने केला आहे. लवकरच आई होणार असलेली आलिया आपल्या ‘डार्लिंग’ या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे प्रमोशन सध्या करते आहे.
देशातील कसदार आणि गुणी कलाकारांमध्ये आलिया भट्ट हिचा समावेश होतो. ‘हायवे’, ‘राझी’ आणि अलीकडेच आलेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ यांसारख्या चित्रपटांतून तिने हे सिद्धही केले आहे. असे असतानाही वारंवार महिलांनाच सगळ्या गोष्टींना तोंड का द्यावे लागते? त्यांना वेगळा आणि पुरुषांना वेगळा असा न्याय का लावला जातो, असा सवाल ती विचारते.
इंडस्ट्रीत आपण स्वतः अनेकदा लिंगवादाची शिकार झाल्याचे आलियाने नुकतेच सांगितले आहे. लोक महिलांनी काय करावे किंवा काय करू नये हे नेहेमी इतर लोक सांगतात. महिलांना काय हवे आहे, हे त्यांना स्वतःलाच का नाही ठरवू देत? या अनुभवांमुळेच आलिया आता अधिक संवेदनशील झाली आहे. कधी-कधी माझे मित्र म्हणतातही की, तू आता एवढी आक्रमक का होतेस? पण मुळातच महिलांसाठी सगळ्या गोष्टी ठरवण्याच्या या वृत्तीची मला चीड येत असल्याचे आलिया सांगते.
पुरुषांच्या अंतर्वस्त्राची जाहिरात उघडपणे चालते, मग महिलांना वेगळा न्याय का, असा तिचा प्रश्न आहे. आलिया म्हणते की, तुमची ब्रा दिसू नये, ती लपवा, असा सल्ला महिलांना देतात. पण, मी म्हणते, कशाला लपवायचे? ते फक्त कापड आहे, असे म्हणत महिलांना मागे खेचणाऱ्या वृत्तींवर आलिया भट्टने टीका केली आहे.
Actress Alia Bhatt on Bra Innerwear’s of Women Entertainment Bollywood