इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये बॉलीवूडमधील अनेक जोडपी बोहोल्यावर चढली. तर काहींच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन देखील झाले. या सगळ्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट.
आलिया – रणबीरचे लग्न झाल्यानंतर लगेचच त्यांना गुड न्यूज मिळाली होती. आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांच्या घरी छोट्या परीचे आगमन झाले. खरं तर आलियाला एकदम फिट राहायला आवडतं. आपले फिटनेसचे किंवा वर्कआऊटचे अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यामुळेच डिलिव्हरीनंतर ती यातून ब्रेक घेईल अशीच चर्चा होती. मात्र, हे सगळे अंदाज चुकवत आलियाने पुन्हा आपल्या वर्कआऊटला सुरुवात केली आहे. आलियाची लेक राहा हिच्या जन्मानंतर काही दिवसांत आलियाने वर्कआउट आणि योगा करायला सुरुवात केली होती. परिणामी आता तिच्यात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन दिसत असून तिला ओळखणंही कठीण झालं आहे. आता तिला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.
‘राहा’च्या जन्मानंतर आलियाने मातृत्व अगदी मनापासून एन्जॉय केलं. आलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आई झाल्यानंतर अनेकदा ती तिचे फोटो शेअर करत असते. आपले मातृत्वाचे अनुभव ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्याचप्रमाणे ती फिटनेस फ्रिकही आहे. तिच्या आरोग्याकडे, तिच्या आहाराकडे ती नेहमीच लक्ष देत असते. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावरून तिने तिचे अनेक वर्कआउट करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. पण आता तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जाती अगदी पंचविशीतली तरुणी दिसत आहे.
आलियाच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गाडीतून उतरून जिममध्ये जाताना दिसत आहे. यावेळी तिने काळ्या रंगाचा हूडी घातला आहे. ती गाडीतून उतरल्यावर मीडिया फोटोग्राफर्सनी तिच्याकडे फोटोसाठी पोझ देण्याची मागणी केली. आलियाने देखील ही मागणी हसत हसत मान्य केली. तिने उभे राहून फोटोग्राफर्सना पोज दिली आणि मग ती तिच्या जिममध्ये गेली. या व्हिडीओमध्ये आलियामधील बदल स्पष्ट दिसतो आहे. आता तिचा हा व्हिडिओ खूप चर्चेत आला असून त्यावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिच्यात झालेल्या या बदलाचं खूप कौतुक केलं. तर अनेक जणांनी “पटकन तिला ओळखलंच नाही” असंही कमेंट करून सांगितलं.
Actress Alia Bhatt Health Body Maintain Pregnancy Delivery