इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिंदी चित्रपटसृष्टीतील किंवा मनोरंजन विश्वातील प्रत्येकजण फिटनेस फ्रिक आहे. आपले वर्कआऊट, डाएट, त्वचेची काळजी या गोष्टींकडे बारकाईने पहिले जाते. तसेच त्याची काटेकोरपणे काळजी घेतली जाते. सध्या बॉलीवूडमध्ये सेलिब्रेशनचे वातावरण आहे. कोणाचे ना कोणाचे लग्न लागते आहे. तर काहींचा साखरपुडा झाला आहे. याशिवाय बाळंत झालेल्या अभिनेत्री वेगळ्याच. यातीलच आलिया भट्ट या अभिनेत्रीने वर्कआऊटला देखील सुरुवात केली आहे.
अवघ्या दीड महिन्यांपूर्वी अभिनेत्री आलिया भट्टच्या घरी छोट्या परीचे आगमन झाले. आलियाने रणबीर कपूरही लग्न केले आहे. तेव्हापासून आलिया मातृत्वाचा आनंद घेत आहे. आई झाल्यानंतर अनेकदा ती तिचे फोटो शेअर करत असते. त्या फोटोंमधून ती मातृत्व कशी एन्जॉय करतेय हे चाहत्यांना सांगत असते. सोशल मीडियावर आलिया भलतीच सक्रिय असल्याचा फायदा तिच्या प्रेक्षकांना होतो आहे. नुकतंच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती योगासन करताना दिसत आहे.
आलिया वर्कआऊटचे व्हिडीओ नेहमी शेअर करत असते. या फोटोमध्ये ती एका झुल्यावर लटकताना दिसत आहे. विशेष म्हणजे यात तिचे डोके खाली आणि पाय वर आहेत. कॅमेऱ्यासाठी पोज देताना आलियाने नमस्ते केले आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना आलियाने लिहिले की, “दीड महिन्यानंतर हळूहळू मी बॅक तो नॉर्मल येते आहे. माझ्या शिक्षक @anshukayoga यांच्या मार्गदर्शनाने मी आज हे करू शकले. हे सांगतानाच आलिया आपल्यासारख्याच नुकत्याच आई झालेल्या महिलांसाठी मोलाचा सल्ला देते. ती म्हणते, गर्भधारणेनंतर आपल्या शरीराचे ऐकणे महत्त्वाचे आहे. आपले मन जर एखादी गोष्ट करू नको असे सांगत असेल तळ ते अजिबात करू नका. पहिले दोन आठवडे, मी केवळ श्वासावर मन एकाग्र केलं होत. मला अजून बराच पल्ला गाठायचा असल्याचेही ती सांगते.
आलिया बाळंत झाल्यानंतर ती वर्षभर तरी काम करणार नाही, वर्षभर कामापासून ब्रेक घेणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आलियाने वेगळाच विचार केला आहे. राहाच्या जन्माच्या तीन महिन्यानंतरच ती नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. फरहान अख्तरच्या आगामी चित्रपटात आलिया महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. गरोदरपणा नंतर ते थेट याच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल असंही बोललं गेलं. मात्र आता ती फरहान अख्तर च्या नव्हे तर संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.
Actress Alia Bhatt Exercise Yoga After Delivery Few Months