इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. आलियासोबतच रणबीरही अत्यंत आनंदी दिसत होता. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर आलियाने आपल्या बेबी शॉवरचे अर्थात डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत. यात ती अतिशय आनंदी दिसत आहे.
नुकताच आलियाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. ‘मॉम टू बी’ आलियाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा ग्लो दिसतो आहे. यासोबत तिच्या चेहऱ्यावर बाळाच्या आगमनाचा आनंद देखील दिसतो आहे. दुसरीकडे रणबीर कपूर देखील बाबा होण्याच्या जबाबदारीसाठी सज्ज आणि उत्सुक आहे. या कार्यक्रमात आलियानं पारंपरिक पेहराव केला होता. पिवळ्या रंगाच्या या सूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर रणबीर कपूरनं बेबी पिंक कलरचा कुर्ता घातला होता.
आलियाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची थीम ‘गर्ल्स गॅंग’ होती. आलियाची आई म्हणजेच सोनी राझदान आणि सासू म्हणजे नीतू कपूर यांनी सगळी पार्टी आयोजित करण्यात मेहनत घेतली. आलिया भट्टच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र आले होते. आलिया आणि रणबीरनं या कार्यक्रमात खास फोटोशूट केलं. आलियानं तिच्या इन्स्टावर हे खास क्षण शेअर केले आहेत. आलियाच्या माहेरचं अख्खं कुटुंब या सोहोळ्यात हजर होतं. निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट हे लेकीच्या आनंदात मोठ्या उत्साहात सहभागी झाले.
Bollywood Actress Alia Bhatt Baby Shower Ceremony