इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्वतःच्या अभिनयासोबत गायक म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंग एका वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. भोजपुरी अभिनेत्री असलेल्या अक्षरा सिंहचा एमएमएस व्हिडीओ लीक झाल्याचं समजतंय. अक्षरा ही फक्त युपी बिहारमध्येच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. अक्षराची गाणी अनेकदा युट्यूबवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अक्षरा सिंह नावाने हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
सोशल मीडियावर अक्षरा सिंहच्या नावाने एक एमएमएस व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा अक्षराचा व्हिडीओ आहे की मॉर्फ केलेला व्हिडीओ आहे, हे स्पष्ट होऊ शकलं नाही. युट्यूबवरील अनेक युजर्स हा कथित व्हिडिओ अक्षराचा असल्याचा दावा करत आहेत. या व्हिडिओवर अद्याप तिची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अक्षराचे चाहते आणि ट्रोलर्स यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. एकीकडे ट्रोलर्स अक्षरावर निशाणा साधत आहेत, तर दुसरीकडे तिचे चाहते हा व्हिडिओ फेक असल्याचं म्हणत आहेत. यासोबतच ते अक्षरालाही समोर येऊन याबाबत बोलण्याची विनंती करत आहेत.
‘कच्चा बदाम’ गाण्यातील अभिनेत्री अंजली अरोराचा देखील एमएमएस लीक झाल्याची घटना नुकतीच घडली होती. तसेच याआधीही अनेक भोजपुरी सेलिब्रिटींचे कथित एमएमएस व्हिडिओ लीक झाल्याचा दावा करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच भोजपुरी गायिका शिल्पी राजचा एक कथित एमएमएस लीक झाल्याचा दावा केला होता. मात्र त्यावर प्रतिक्रिया देत शिल्पीने तो व्हिडीओ बनावट असल्याचं स्पष्ट केलं होतं. याशिवाय अभिनेत्री काजल राघवानीवरही असाच आरोप करण्यात आला होता. नंतर व्हिडिओत दिसणारी मुलगी काजल नसल्याचं स्पष्ट झाले.
दरम्यान, अक्षरा ही भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आतापर्यंत अनेक भोजपुरी सुपरस्टार्ससोबत चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोमध्येही दिसली होती. काही दिवसांपूर्वी तिचा आमिर खानसोबतचा डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.
Actress Akshara Singh MMS Video Leak in Social Media
Bhojpuri Singer Entertainment