इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह हिच्या पाटणा येथील कंकरबाग येथील घरावर पोलिसांनी नोटीस चिकटवली आहे. नोटीसमध्ये त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ती हजर न झाल्यास पोलीस तिला अटक करू शकतात. वैशाली पोलिसांनी ही नोटिस बजावली आहे. हे प्रकरण मागच्या वर्षीचे आहे, जेव्हा अक्षरा सिंह मुन्ना शुक्लाच्या घरी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेली होती आणि तिथल्या गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोव्हेंबर २०२१ मध्ये बाहुबली मुन्ना शुक्लाच्या भाच्याच्या उपनयन समारंभात अक्षरा सिंहला कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले होते. अक्षरा सिंहच्या कार्यक्रमात उघड गोळीबार झाला होता. त्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी मुन्ना शुक्लासह त्याची पत्नी, अभिनेत्री अक्षरा सिंह आणि त्याच्या अंगरक्षकावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी मुन्ना शुक्ला आणि इतर आरोपींनी कोर्टातून जामीन घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अक्षरा सिंगने जामीन घेतला नाही. त्यामुळे पोलिसांनी आता त्याच्या घरी नोटीस चिकटवली आहे.
अक्षरा सिंगला अटक होणार का?
यासंदर्भात लालगंजचे तपास अधिकारी अमरेंद्र कुमार यांनी फोनवरील संवादादरम्यान सांगितले की, ही नोटीस देसरीचे एसएचओ सुनील कुमार यांनी गेल्या महिन्याच्या २५ तारखेला चिकटवली होती. ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी ते लालगंजमध्ये एसआय म्हणून तैनात होते. घटनेच्या वेळी ते या प्रकरणाचे तपासाधिकारी होते. अक्षरा सिंग कोर्टात हजर न राहिल्यास पुढील कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. अक्षरा सिंग सध्या मुंबईत आहे, गरज पडल्यास तिथे एक टीम पाठवली जाईल. सध्या अक्षराच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
Actress Akshara Singh Arrest Chances
Police Crime Gun Fire