इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक काळ चित्रपट सृष्टीपासून लांब राहिलेली अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय – बच्चन हिने काही काळापूर्वी पुनरागमन केले. यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्यासोबत तिचा एक चित्रपट आला, आणि तो चांगलाच चालला देखील. ‘पोन्नियिन सेल्वन-१’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच पसंत पडला. अलीकडे सिक्वेलचा जमाना असल्याने या चित्रपटाचा सिक्वेल कधी येईल, अशी प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्यांची ही उत्सुकता पूर्ण झाली असून या चित्रपटाचा दुसरा भाग २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला.
पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही अभिनेत्री ऐश्वर्या राय या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील ऐश्वर्या रायच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘पोन्नियिन सेल्वन-२’ या चित्रपटातील तिच्या कामाचेही सर्वत्र कौतुक होत आहे. अर्थात आम्ही काही तुम्हाला ही माहिती देत नाही. तर ऐश्वर्याने या भूमिकेसाठी प्रचंड मानधन आकारले आहे, याची माहिती आम्ही देणार आहोत.
मानधनाचा आकडा मोठा
‘पोन्नियिन सेल्वन-१’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन-२’ हे दोन्ही चित्रपट प्रचंड खर्च करून बनवले गेले आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी निर्मात्यांनी २५० कोटी रुपये खर्च केले होते. तर दुसरा भाग तयार करण्यासाठीही निर्मात्यांनी बराच खर्च केला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी ऐश्वर्याने तब्बल १० कोटी मानधन घेतले होते. तर या चित्रपटाच्या पुढील भागासाठी ऐश्वर्या रायने १२ कोटी मानधन घेतले आहे.
काय आहे कथा?
‘पोन्नियिन सेल्वन-२’ ची कथा चौल सम्राट राजा चोल यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागातही कथा या राजाभोवती फिरताना दिसली होती. आता दुसऱ्या भागात ही कथा पुढे सरकताना दिसत आहे. हा चित्रपट भारतात तामिळ, हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम् अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Actress Aishwarya Rai Ponniyin Selvan 2 Film Amount