इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शालेय जीवनात अत्यंत हुशार असलेली ही अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री अपघातानेच या क्षेत्रात आली, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण, हे खरं आहे. मिस वर्ल्ड राहिलेल्या या अभिनेत्रीला खरे तर वास्तुविशारद अर्थात आर्किटेक्ट व्हायचे होते. पण, महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना ती अपघाताने याच क्षेत्रात आली. लवकरच ती एका मोठ्या चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. तिचे चाहते देखील त्याच्या या चित्रपटाची वाट पहात आहेत. आम्ही कोणाबाबत बोलतो आहोत, हे कदाचित कळलं असेल तुम्हाला. होय, आम्ही ऐश्वर्या रॉय – बच्चन बाबतच बोलतो आहोत.
तिचा पोनियन सेल्वन – १ हा चित्रपट येऊ घातला आहे. मणिरत्नम दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटाची सर्वचजण आतुरतेने वाट पहात आहेत. या चित्रपटात ऐश्वर्यासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रम दिसणार आहे. या चित्रपटाची कथा चौल राजवंशावर आधारित आहे. पौराणिक चित्रपट असल्याने या चित्रपटातील ऐश्वर्याचा लूक अत्यंत सुंदर असणार आहे. त्यामुळेच तिचे चाहते या चित्रपटाची वाट पहात आहेत. अशी ही सुंदर अभिनेत्री अभ्यासातही हुशार आहे. बारावीत तिला 90 टक्के मिळाले होते. साहजिकच तिची स्वप्न देखील खूप शिकण्याची होती. त्यामुळेच चित्रपटसृष्टीत येण्याचा विचारही तिने केला नव्हता.
1 नोव्हेंबर 1973 रोजी ऐश्वर्याचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर काही वर्षांनी रॉय कुटुंब मुंबईत आले आणि इथेच स्थायिक झाले. तिचं संपूर्ण शिक्षण मुंबईतच झालं. 1994 मध्ये ती मिस वर्ल्ड झाली आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. शाळा – कॉलेजमध्ये ब्राईट स्टुडंट असलेली ऐश्वर्या तेंव्हा मॉडेलिंग करत होती पण हौस म्हणून. याशिवाय तिला संगीत आणि नृत्यातही चांगली गती आहे.लबारावीला 90 टक्के मिळवल्यावर तिने पदवीसाठी ऍडमिशन घेतली. पण त्याच काळात तिला ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटाची ऑफर आली. या चित्रपटात जरी तिने काम केले नसले तरी त्यानंतर तिच्या शिक्षणात खंड पडला. नाहीतर आर्किटेक्ट व्हायचे तिचे स्वप्न होते.
आताही मणिरत्नम यांच्या चित्रपटाद्वारे ऐश्वर्या ४ वर्षांनी पुनरागमन केले आहे. ‘पोन्नीयन सेल्वन’ या चित्रपटात ती नंदिनीची भूमिका साकारली आहे. जवळपास साडे तीन मिनिटांच्या या ट्रेलरमधून दिसणारी चित्रपटाची भव्यता डोळ्यांचे पारणे फेडते. हा ट्रेलर पाहून ‘बाहुबली’ चित्रपटाची हटकून आठवण येते. सोशल मीडियावर सध्या या ट्रेलरची चांगलीच चर्चा आहे. तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा ५ भाषांमध्ये हा ट्रेलर आहे. या ट्रेलरच्या शेवटी ऐश्वर्या समोर येते. यात तिची दुहेरी भूमिका आहे. त्यामुळेच प्रेक्षक आणि ऐश्वर्याचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
Actress Aishwarya Rai Life Career Journey
Bollywood Entertainment