इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सध्या चित्रपटगृह रिकामीच दिसतात. बॉलीवूडमध्ये चाललेला बॉयकॉटचा ट्रेंड आणि दर्जेदार चित्रपटांची वानवा यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहाकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे चित्रपटगृहांवर हाऊसफुल्लचा फलक दिसणे दुर्मिळ असले तरी लवकरच चित्रपटगृह हाऊसफुल्ल होतील असा चित्रपट लवकरच येतोय. ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
केवळ ट्रेलरवरून चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज आपण बांधू शकतो. मणिरत्नम यांची कलाकृती असलेला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक वाट पाहात आहेत. तर ओटीटी प्लॅटफॉर्मने देखील मोठी रक्कम देऊन हा चित्रपट खरेदी केला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन दिसणार असून तिचा १० व्या शतकातील राणीचा लूक घायाळ करणारा आहे.
मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. जेव्हापासून चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे, तेव्हापासून त्याला खूप पसंती मिळते आहे. हा चित्रपट ५०० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. खूप मोठा बजेट असलेला मणिरत्नम यांचा हा चित्रपट आहे. कल्की कृष्णमूर्ती यांच्या ऐतिहासिक कादंबरीवर ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटाचे कथानक आधारित आहे.
चौल साम्राज्याची कथा या चित्रपटामधून मांडण्यात आली आहे. या चित्रपटाची क्रेझ उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत दिसते आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून लोकांमध्ये या चित्रपटाचीच चर्चा आहे. या सगळ्यामध्ये ऐश्वर्या रायचा ‘पोन्नियिन सेल्वन’मधील लूक खूप आवडला आहे. चित्रपटात अभिनेता विक्रम यांच्या ट्रेलरमधील लूकनं आणि फिटनेसनं अनेकांचे लक्ष वेधले.
ट्रेलरच्या शेवटी सिंहासनाकडे पाहणारी ऐश्वर्या दिसते आहे. याचा अर्थ या चित्रपटामध्ये ‘सिंहासना’साठी होणारी लढाई दाखवण्यात येणार आहे. ऐश्वर्या आणि विक्रम यांच्यासोबतच अभिनेत्री शोभिता धूलिपाला आणि जयम रवी हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट दोन भागात असणार आहे. या चित्रपटाला पाहून बाहुबली चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. एकंदर हा चित्रपट बाहुबलीला देखील मागे टाकेल असा अंदाज आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रदर्शित झाल्यावरच याबद्दल नक्की काय ते कळेल. सध्यातरी चित्रपटाच्या ट्रिझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे हे खरे.
Actress Aishwarya Rai Bacchan PS I Movie Trailer
Bollywood