मुंबई – मनोरंजन क्षेत्रातील तारे-तारकांचे जीवन दुरून जितके चमचमते दिसते, अनेक जणांना त्याच्या विरुद्ध अनुभव येतो. अनेकांनी आतील सत्य अनेकदा समोर आणले आहे. कास्टिंग काउच हा सिनेमाच्या या काळोखातील एक पैलू आहे. अनेक टीव्ही अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या कास्टिंग काउचचा उल्लेख केला आहे. अशाच एका घटनेचा अनुभव तारक मेहता का उलटा चष्मा या प्रसिद्ध मालिकेमधील अभिनेत्री आराधना शर्मा हिने शेअर केला आहे.
पाच वर्षांपूर्वीची घटना
आराधनाने नुकतीच ई-टाइम्सला मुलाखत दिली. कास्टिंग काउच मुद्याबाबत ती म्हणाली, तिच्यासोबत पाच वर्षांपूर्वी कास्टिंग काउचचे प्रकरण घडले होते. पुण्यात शिक्षण सुरू असतानाची ही घटना पूर्ण आयुष्यात विसरू शकत नाही. काही मॉडेलिंगचे प्रोजेक्ट मिळत असल्याने ती थोडीफार प्रसिद्धही होती. त्यादरम्यान एक जण मुंबईच्या प्रोजेक्टसाठी कास्टिंग करत होता.
रांचीमध्ये स्क्रीप्ट रिडिंग
आराधना सांगते, रांचीमध्ये स्क्रिप्ट रिडिंग होणार होती. तिथे ती गेली होती. स्क्रिप्ट रिडिंग माझ्या राहण्याच्या गावी होत होती. स्क्रिप्ट रिडिंग करताना तो मला सारखा स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. काय सुरू आहे हे तिला समजतच नव्हते. तिने त्याला धक्का दिला, दरवाजा उघडला आणि तिथून पळून गेली. तो खूपच वाईट होता. याबाबत अनेक दिवसांपर्यंत ती सांगू शकली नाही.
कोणावरही विश्वास नाही
ती म्हणाली, ही घटना घडली तेव्हा ती १९-२० वर्षांची होती. तिला खूपच वाईट वाटत होते. त्यानंतर ती कोणावरच विश्वास ठेवू शकत नव्हती. ती कोणत्याही पुरुषासोबत एका खोलीत एकटी राहू शकत नाही. तो तिचा पती का असेना. ती आणि तिची आई त्याच्याविरोधात उभे राहणार होते. परंतु कुटुंबातील इतर सदस्यांनी विरोध केला.