पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठी टीव्ही सिरीयल्समधील दोन मित्र लग्नबंधनात अडकले आहेत. अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी आपल्या आयुष्यातील नव्या पर्वाला प्रारंभ केला आहे. विराजसने शिवानी सोबत लग्न केले आहे. आणि आपल्या चाहत्यांसाठी त्याचे फोटो शेअर केले आहेत. शिवानीने काही महिन्यांपूर्वी विराजस सोबतचा एक फोटो सोशल मिडियात शेअर करुन गुडन्यूज दिली होती.
मराठी फेम आणि ‘माझा होशील ना’ या मालेकेतून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी अखेर त्यांचे नाते बदलण्याचे ठरविले. शिवानीने तिचा आणि विराजसचा फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला होता. त्यात ती तिच्या बोटातील अंगठी दाखवत होती. फोटो शेअर करत तिने लिहिले होते की, ’अंगठी घातली..’. तसेच तिने #virani(विरानी) हा hashtag सुद्धा वापरला होता. त्याचबरोबर हा फोटो विराजसची आई आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सुद्धा आपल्या सोशल मेडियावर शेअर केला होता. ‘या वर्षी मैत्री नात्यात बदलणार’ असं मृणाल यांनी पोस्टमध्ये लिहीले होते. त्यानंतर आता दोघेही विवाहबद्ध झाले आहेत. या विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते. लग्न समारंभात विराजस आणि शिवानी हे दोघे प्रचंड खुष असल्याचे दिसत आहे. मराठी मालिका इंडस्ट्रीतील या जोडप्यावर त्यांचा मित्र आणि सहकारी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
https://www.facebook.com/100000296021935/posts/5539586752727804/