इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमधील कोणत्याही लग्नाची चर्चा होणं हे अगदी ठरलेलं आहे. त्याशिवाय ते लग्न हे लग्न वाटतंच नाही. गेल्या वर्षी बॉलीवूड क्वीन कतरिना आणि विकी कौशल ही जोडी गाजली ती त्यांच्या लग्नामुळे. त्यानंतर आता ही जोडी पुन्हा चर्चेत आली आहे ते त्यांच्या भांडणामुळे. माझं आणि कतरिनाचं भांडण होतं असा खुलासा खुद्द विकी कौशलने केला आहे. आता संसार म्हटला की, भांड्याला भांडं लागणारच. पण विकीने सांगितलेलं भांडणाचं कारण औरच आहे. विकीने एका टीव्ही कार्यक्रमात हा खुलासा केला आहे.
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची प्रेमकहाणी सुरू झाली तीच मुळात करण जोहरमुळे. २०१८ साली विकी कौशल करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात आला होता. यावेळी तुझी आणि कतरिनाची जोडी सुंदर दिसेल, असं करण म्हणाला म्हणाला. हे ऐकून विकी अवाक झाला होता. पुढे विकी कतरिनात असा काही गुंतला की सांगायलाच नको. आता दोघंही आपल्या संसारात आनंदी आहेत.
लग्नानंतर विकी पुन्हा एकदा एका टीव्ही शोमध्ये आला आणि बायकोचं कौतुक करत सुटला. कतरिना खूपच प्रेमळ आहे. ती नेहमी खरं बोलते, आपल्या भूमिकेवर ठाम असते. तिच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं. अशी त्याने तोंड भरून बायकोची स्तुती केली. अगदी तिच्यासारखी बायको मिळाली म्हणून मी स्वतःला नशीबवान मानतो, असही त्याने सांगितलं. पण पुढे याच शोमध्ये विकीने लग्नानंतरच्या भांडणाचा खुलासाही केला.
कतरिना तशी खूप प्रेमळ आहे पण माझं तिच्यासोबत एकाच गोष्टीवरून भांडण होतं, असं तो म्हणाला. क्लोजेट स्पेसच्या कारणावरून आमचं नेहमीच वाजतं. लग्न झाल्यानंतर मला जागा अपुरी पडू लागली आहे. कतरिनाने जवळपास दीड रूम जागेवर कब्जा केला आहे. मला फक्त एकच कपाट आहे, त्याचा सुद्धा लवकरच ड्रॉवर होईल. विकीच्या या म्हणण्यावर करण सुद्धा सहमती दर्शवतो. हो, मी तुझ्या घरी हे सगळं पाहिलं असल्याचे तो म्हणाला. लवकरच कतरिना सलमान खानसोबत ‘टायगर ३’ मध्ये दिसणार आहे. तिचा ‘फोन भूत’ हा सिनेमा देखील ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. तर विकी कौशल ‘गोविंदा नाम मेरा’, ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
Actor Vicky Kaushal on Katrina Kaif
Entertainment Bollywood TV Show