जोधपूर (राजस्थान) – गेल्या महिनाभरापासून केवळ बॉलिवुडमध्ये नव्हे तर संपूर्ण देशभरातील चित्रपट रसिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे एका भव्य दिव्य विवाह सोहळ्याची, राजस्थानमध्ये एका आलिशान पॅलेस तथा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा सध्या सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून संगीत कार्यक्रम, हळदी समारंभ अत्यंत उत्साहात आणि आकर्षक रोषणाई पार पडला. या विवाह सोहळ्यात आज शुभ लग्न सावधानच्या गजरात नवविवाहित दांपत्य सात फेरे घेणार आहेत, अर्थात आता वाचकांच्या लक्षात आलेच असेल की, कोण आहे ते जोडपे..
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ आज, दि. ९ डिसेंबर म्हणजेच गुरुवारी राजस्थानमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाची प्री-वेडिंग फंक्शन्स काल संपली असून आता हॉटेलमध्ये लग्नाची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, या जोडप्याच्या लग्नाच्या वेळेबाबत एक अपडेट समोर आले आहे. विकी-कतरिनाने एका खास वेळी म्हणजे दुपारी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
या जोडप्याच्या शाही लग्नाकडे सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंतच्या नजरा खिळल्या आहेत. या लग्नाबद्दलची सर्व माहिती सर्वांनाच जाणून घ्यायची आहे. दि. ८ डिसेंबर रोजी या जोडप्याचा हळदी आणि संगीत समारंभ होता. विशेष म्हणजे यावेळी ५० हून अधिक पाहुणे त्यांच्या लग्नाच्या हल्दीचे साक्षीदार होण्यासाठी बरवारा फोर्ट हॉटेलमध्ये पोहोचले होते. विवाह बंधनात अडकणारे विकी-कॅटने पाहुण्यांसाठी खास व्यवस्था केली होती. हळदी, संगीतानंतर या जोडप्याने त्यांच्या मित्रांसाठी खास पार्टी ठेवली. कबीर खान, मिनी माथूर, शर्वरी वाघ, नेहा धुपिया, अंगद बेदी आणि राधिका मदन यांच्यासह इंडस्ट्रीतील दोघांचे जवळचे मित्रही त्यांच्या हळदी समारंभात सहभागी झाले होते.
विकी-कतरिना कैफ आज दुपारी ३:३० ते ३:४५ या वेळेत ‘ सातफेरे’ घेतील. तसेच आम्ही सात जन्म सोबत राहू अशा शपथ तथा आणाभाका देखील लग्न विधी प्रसंगी घेतील. विशेष म्हणजे कतरिना आणि विकीच्या लग्नासाठी खास मंडप तयार करण्यात आला असून तो पूर्णपणे शाही शैलीत बनवला आहे. तसेच कतरिना आणि विकी हे सर्व बाजूंनी काचेने बंद असलेल्या पॅव्हेलियनमध्ये सात फेरे घेतील. त्याच्या लग्नाचा मंडप अशा प्रकारे बांधण्यात आला आहे की तो मंदिरासमोर आहे. तसेच लग्नानंतर विकी आणि कतरिना चौथ मातेच्या मंदिरात आशीर्वाद घेणार आहेत.