जयपूर (राजस्थान) – बॉलीवूड मधील कलाकारांविषयी रसिकांना खूपच आकर्षण वाटते, त्यातच त्यांच्या खासगी जीवनाविषयी देखील या चाहत्यांना माहिती जाणून घ्यायचे असते. इतकेच नव्हे तर कोणकोणा सोबत लग्न करणार ? याची चर्चा तर होतेच. परंतु हे लग्न कसे होणार ? याची देखील रसिकांना उत्सुकता असते. सध्या अशाच एका जोडप्याच्या विवाह सोहळ्याविषयी केवळ बॉलीवूड मध्येच नव्हे तर संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे.
अभिनेता विकी कौशल व अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाबद्दल चाहत्यांना अधिकाधिक जाणून घ्यायचे आहे. विकी – कतरिना यांचे लग्न दि. ७ ते १० डिसेंबर या ४ दिवसांसाठी १२० खास पाहुणे लग्न समारंभासाठी येणार आहेत, तसेच सवाई माधोपूर जिल्ह्यातील ‘ चौथ का बरवाडा ‘ येथे एका आलीशान हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा होणार आहे. दि.९ डिसेंबरला विकी – कतरिना हे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. त्याकरिता लग्नाची तयारी जोरात सुरू असताना दुसरीकडे या संदर्भात गोपनीयतेकडेही लक्ष दिले जात आहे. लग्नात मोबाईल वापरणाऱ्या फॅन व चाहत्यांवर बंदी घालण्यात येणार असून ड्रोनचा वापर देखील करता येणार नाही. या सोहळ्याच्या फोटोशुटींगचे कंत्राट आणि हक्क एका प्रख्यात परदेशी कंपनीला देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे विकी आणि कतरिनाच्या लग्नाचे फोटो लीक होऊ नयेत म्हणूनच या मोबाईलवर बंदी घालण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. दरम्यान, विकी-कतरिनाचे हे लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल मॅगझिनद्वारे रिलीज केले जाणार असल्याचे सांगण्यात आहेत. तसेच लग्नाच्या परिसरात ड्रोन उडवता येणार नाही
या विवाहाच्या कार्यक्रमांबाबत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. चार दिवस चालणाऱ्या या विवाह सोहळ्याबाबत कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती, तसेच लग्नाला उपस्थित असलेल्यांना अँटी-कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेले पाहिजेत आणि ज्यांनी लशीकरण केलेले नाही त्यांना आरटी-पीसीआर चाचणीचा निगेव्हीट अहवाल अनिवार्य आहे.
कतरिना नुकतीच सूर्यवंशीमध्ये दिसली होती, तर ती लवकरच सलमान खानसोबत टायगर ३ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर अली अब्बास जफरच्या सुपरहिरो चित्रपटातही ती दिसणार आहे. तर विकी कौशल अलीकडेच सरदार उधममध्ये दिसला होता आणि त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये सॅम माणेकशॉचा बायोपिक, गोविंदा मेरा नाम आणि करण जोहरचा तख्त यांचा समावेश आहे.