मुंबई – सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. सिनेतारकांसोबतच त्यांच्या चाहत्यांनाही त्याच्या लग्नाची उत्सुकता आहे. ते लग्न केव्हा, कुठे आणि कसे करणार याची मोठी उत्कंठा चाहत्यांसह अनेकांना आहे. या लग्न सोहळ्यातील काही बाबी आता समोर आल्या आहेत.
विकी आणि कतरिना यांच्या अफेअरची चर्चा गेल्या काही वर्षांपासून होत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या लग्नाच्या वार्तांचा बाजार गरम आहे. शिवाय दोघांचे चाहते लाखो आहेत. त्यामुळेच या दोघांच्या हालचालींवरही चाहत्यांची मोठी नजर असते. हे दोघे कुठे आहेत, काय करत आहेत, ते कुठले फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करतात याकडे चाहत्यांचे चांगले लक्ष आहे. अखेर आता विकी आणि कतरिना विवाह बंधनात अडकणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळेच या सोहळ्याविषयीची उत्सुकता वाढली आहे. आज आपण त्याविषयीच अधिक माहिती घेणार आहोत.
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह सोहळा हा राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट या आलिशान हॉटेलमध्ये होणार असल्याचे समोर येत आहे. दि. ७ ते १२ डिसेंबर दरम्यान हा लग्नसोहळा चालणार आहे. म्हणजेच तब्बल ५ दिवसांचा जंगी सोहळा असणार आहे. सुमारे ५ दिवस चालणाऱ्या जोडप्याच्या लग्नातील विशेष पाहुण्यांमध्ये अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. मात्र, अभिनेत्री किंवा अभिनेत्याकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु या लग्नासाठी अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहतील अशी चर्चा आहे.
कतरिना-विकी एकीकडे त्यांच्या लग्नाच्या चर्चेत असतानाच दुसरीकडे ते दोघे वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र दिसले. कधी राजस्थानच्या सिक्स सेन्सेस बरवारा किल्ल्यावर तर कधी सेलिब्रिटी मॅनेजर रेश्मा शेट्टीच्या ऑफिसमध्ये तर कधी दिग्दर्शक कबीर खानच्या घरी दिवाळी पार्टी करताना ते दिसले. लग्नापूर्वी या जोडप्यानं बद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू असून त्यातील काही अफवा देखील आहेत.
विकी आणि कतरिनाच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. दोघांनी आपापल्या बाजूने बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक मित्रांना बोलावले आहे. या पाहुण्यांच्या यादीत करण जोहर, अली अब्बास जफर, कबीर खान, मिनी माथूर, रोहित शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, वरुण धवन आणि नताशा दलाल यांचा समावेश आहे.
विकी आणि कतरिना राजस्थानमधील हॉटेल सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये लग्न करणार असून हे हॉटेल सवाई माधोपूर जिल्ह्यात आहे. हॉटेलचे बुकिंग ७ ते १२ डिसेंबरपर्यंत झाले आहे. हॉटेलचे सर्वात महागडे निवासस्थान म्हणजे राजा मानसिंग स्वीट तथा सूट ( रूम ) होय. कारण या रूमचे भाडे तारखा आणि उपलब्धतेनुसार ६४ हजार ते ९० हजार रूपयांपर्यंत आहे. काही विशेष पाहण्यासाठी या आलिशान रूम तथा स्वीट बुक करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.