इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्व हे प्रेक्षकांसाठी विरंगुळ्याची जागा आहे. त्यामुळेच तिथे घडणारी प्रत्येक गोष्ट प्रेक्षक तसेच चाहते फार इंटरेस्टने ऐकतात, पाहतात. त्यावर ते आपलं मतही व्यक्त करतात. कलाकारांकडून चूक झाल्यावर त्यांचे कान उपटणारे चाहते कधी कधी त्यांच्याबद्दल खूप संवेदनशील देखील होतात. याचा प्रत्यय नुकताच बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवनला आला आहे. अभिनेता वरुण धवनने त्याच्या चाहत्यांना काही दिवसांपूर्वी वेस्टिबुलर हायपोफंक्शनचा सामना करत असल्याचे सांगितले होते. यानंतर वरुणने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
वरुण धवन याने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. त्याचे असंख्य चाहते आहेत. वेस्टिब्युलर हायपोफंक्शन नावाच्या दुर्मिळ आजाराशी वरुण झुंज देत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतीच त्याने आपल्या तब्येतिची माहिती दिली होती. वेस्टिब्युलर हायपोफंक्शन’ म्हणजे कानाच्या आतील प्रणाली जी योग्यरित्या कार्य करत नाही. कानाच्या आत असलेली वेस्टिब्युलर प्रणाली डोळ्यासह कार्य करते आणि स्नायू संतुलित करण्याचा प्रयत्न करते. जेव्हा ते नीट काम करत नाही, तेव्हा कानातून ऐकलेल्या गोष्टी मेंदूपर्यंत नीट पोहोचत नाहीत. अशा स्थितीत व्यक्तीला चक्कर येऊ लागते.
पहिल्या १-२ दिवसात चक्कर येणे आणि घाबरण्याची लक्षणे अधिक तीव्र असतात. तीन आठवड्यांनंतर रुग्ण सामान्य स्थितीत येतात. परंतु काही रुग्णांमध्ये डोके वेगाने हलवल्यानंतर काही महिने असंतुलन तसेच राहते. वरुणने याबाबत ट्विट करत ही माहिती दिली. वरुण म्हणतो, “मित्रांनो, एका मुलाखतीत मी माझ्या आजारावर भाष्य केले. तेव्हापासून तुम्ही मला काळजी घेण्याचा सल्ला दिलात. तुमचे प्रेम आणि खंबीर पाठिंब्यामुळेच मी या परिस्थितीचा सामना करू शकलो.” असे म्हणत त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. वरुण आणि क्रिती सेननच्या ‘भेडिया’ या सिनेमाचा ट्रिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याबाबत प्रेक्षक उत्सुक आहेत. २५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासोबतच नितेश तिवारी दिग्दर्शित ‘बावल’ सिनेमात वरुण झळकणार आहे.
https://twitter.com/Varun_dvn/status/1589679308632887297?s=20&t=xYwLxrUNMDwfVw-k_Levyg
Actor Varun Dhawan Health Disease Symptoms