मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बडे उद्योजक, मोठे व्यावसायिक आणि चित्रपट अभिनेते प्रचंड मोठी मोठ्या प्रमाणात बँकेकडून कर्ज घेतात. परंतु या कर्जाची परतफेड करण्यास काही अडचण आल्याने मग बँकेची नोटीस येते. गेल्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आता प्रसिद्ध चित्रपट अभिनेता सनी देओल याचा ‘गदर २ ‘ हा चित्रपट खूप चर्चेत असताना त्याला एका बँकेने सुमारे ५६ कोटीचे कर्ज थकवल्याप्रकरणी बंगल्याचा लिलाव करण्याची नोटीस पाठविली आहे. मात्र, आता बँकेने याप्रकरणी युटर्न घेतला आहे. हा लिलाव तांत्रिक कारणास्तव स्थगित करीत असल्याचे बँकेने म्हटले आहे.
अभिनेता धमेंद्रचा पुत्र सनी देओल हा देखील हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता असून १७ व्या लोकसभेचे सदस्य देखील आहेत. सनी देओल यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. त्याचा पहिला चित्रपट ‘बेताब’ हा सन १९८३ मध्ये प्रदर्शित झाला होता. सन २०१६ मध्ये त्याचा ‘घायल: वन्स अगेंन’ हा चित्रपट रिलीज झाला होता. इतकेच नव्हे तर त्याचा गदर हा चित्रपट चांगलाच गाजला होता. भारत – पाकिस्तान संबंधावर हा चित्रपट आधारित होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा गदर २ हा चित्रपट प्रसिद्ध झाला असून प्रदर्शित झाला असून त्याचीही जोरदार चर्चा आहे. कारण या चित्रपटाने ३०० कोटी रुपयांची कमी कमाई केल्याचे सांगण्यात येते. परंतु दुसरीकडे सनी देओलने कर्जापोटीच्या ५६ कोटींची परतफेड केली नसल्याने अडचणीत आला आहे.
जुहू परिसरात अनेक सेलिब्रिटी व अभिनेते यांचे बंगले आहेत. कारण हा परिसर पॉश एरिया म्हणून ओळखला जातो. याच भागात सनी देओलचा बंगला असून ५६ कोटींची ही थकबाकी वसूल करण्यासाठी ‘बँक ऑफ बडोदा’ने सनी देओलच्या जुहूतील बंगल्याच्या लिलावासाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. येत्या महिनाभरात म्हणजे २५ सप्टेंबरला हा लिलाव होणार आहे. सनी देओलने बडोदा बँकेकडून कर्ज घेतले होते. तेव्हा त्याने सनी व्हिला नावाचा बंगला यासाठी तारण म्हणून ठेवला होता. मात्र या कर्जाची परतफेड सनी देओल यांनी केली नसून ५६ कोटींची रक्कम थकविली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी अखेर बँकेने सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार यासाठी ५१ कोटी ४३ लाख रुपये अशी बोली लावण्यात आली आहे. आता हा बंगला कोण खरेदी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थगितीचा आज निर्णय
बडोदा बँकेने मात्र सनी देओलच्या बंगला लिलावाला स्थगिती दिली आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही प्रक्रिया स्थगिती दिल्याचे बँकेने म्हटले आहे.
Actor Sunny Deol Juhu Bungalow Auction Baroda Bank
Mumbai BOB Bollywood