इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वातील कलाकार हे त्यांच्या उंची लाईफस्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असतात. या लाईफस्टाईलची अनेकांना भुरळ पडते. कलाकारांप्रमाणे त्यांच्या घरच्याची चर्चा फारशी ऐकायला मिळत नाही. अशाच एका कुटुंबाच्या घरच्यांची माहिती आम्ही देणार आहोत. एका कलाकाराची बायको आपल्या उद्योग व्यवसायातून कोट्यवधींची कमाई करते. तीच नाव आहे मान शेट्टी, मान ही अभिनेता सुनील शेट्टीची बायको आहे. बॉलिवूडच्या चमचमत्या दूनियेपासून माना दूरच असते.
सुनील शेट्टी हे नाव बॉलीवूड मध्ये आजही आदराने घेतले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने या क्षेत्रात प्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवले आहे. आता त्याचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. अभिनेता असण्यासोबतच सुनील शेट्टी एक यशस्वी उद्योजकही आहे. त्यामुळे तो पैशासांठी सिनेमांवर अजिबात अवलंबून नाही. सुनील शेट्टीपेक्षा त्याची बायको जास्त श्रीमंत आहे. सुनील शेट्टीच्या पत्नीचं नाव मान शेट्टी. मानला बॉलिवूडमधील लेडी अंबानी म्हटलं जातं. मान ही एक बिझनेस वूमन आहे. समाजसेविकाही म्हणून देखील तिची ओळख आहे.
विशेष म्हणजे घर आणि व्यवसाय या दोघांचा ती बरोबर समतोल राखते. मान आणि सुनील शेट्टी यांनी मिळून S2 हा रिअल इस्टेट प्रोजेक्ट सुरू केला होता. या प्रोजेक्ट अंतर्गत त्यांनी मुंबईत २१ लक्झरी विला उभारले आहेत. मानच एक लाइफस्टाइल स्टोअरदेखील आहे. यात डेकोरेशनपासून ते दैनंदिन जीवनात लागणाऱ्या काही लक्झरी वस्तूही सहज उपलब्ध होतात.
विशेष म्हणजे यासोबत समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही सामाजिक जाणीव देखील मान जपते आहे. ‘सेव्ह द चिल्ड्रन इंडिया’ ही एनजीओदेखील मान ही चालवते. तसंच सुनील शेट्टीचं एक प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. त्यामुळे ही नवरा बायकोची जोडी वर्षाला कोट्यवधींची कमाई करते.
Actor Sunil Shetty Wife Luxury Lifestyle Wealth