मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड मधील कलाकार म्हणजेच अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या लग्नाची नेहमी चर्चा होत असते. त्याचप्रमाणे क्रिकेटर हे देखील सेलिब्रिटीज असून त्यांच्या देखील विवाह संदर्भात सोशल मीडियावर चर्चा रंगते. इतकेच नव्हे तर क्रिकेटर आणि बॉलीवूड मधील कलाकार यांच्या एकमेकांशी होणाऱ्या लग्नाची चर्चा होते. आता देखील एक बॉलीवूड मधील कलाकाराची कन्या आणि क्रिकेटपटू हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत, सध्या सर्वत्र त्याचे चर्चा सुरू आहे.
प्रसिद्ध अभिनेता सुनिल शेट्टीची कन्या अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. पण या दोघांनी अजूनही आपल्या नात्याची फारशी उघडपणे कबुली दिली नाही. अथिया-केएल राहुल लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्याही सध्या चर्चा रंगत आहेत. इतकेच नव्हे तर या दोघांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात केली असून दाक्षिणात्य पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे सांगण्यात येते.
आता या दोघांच्या लग्नाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. अथिया आणि केएल राहुल पुढील तीन महिन्यांमध्ये लग्न करणार असल्याचं म्हटेल जात आहे. अथियाच्या जवळच्या व्यक्तीने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, “३ वर्षांपासून अधिक काळ अथिया-के एल राहुल एकमेकांना डेट करत आहेत. डिसेंबर हे दोघं लग्न करतील. सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. तसेच अथिया आणि केएल राहुल नेहमीच एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. आता या सेलिब्रिटी कपलच्या लग्नाची सारेच जण उत्सुकतेने वाट पाहत आहे
या शिवाय राहुलच्या कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वीच अथियाच्या आई-वडिलांची भेट घेतली असल्याचीही चर्चा आहे. तसेच मध्यंतरी अथिया-राहुलने वांद्रे येथे नवं घर खरेदी केलं. ते घर पाहण्यासाठी देखील राहुलचे कुटुंबिय गेले होते. लग्नानंतर अथिया-राहुल याच घरात राहणार आहेत. मुंबईमध्येच अभिनेता सुनिल शेट्टीच्या कन्येचा विवाहसोहळा होणार आहे, असे सांगण्यात येते.
Actor Sunil Shetty daughter Athiya will marry with Cricketer K L Rahul