मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेत शरद पोंक्षे यांची कन्या सिद्धी पायलट झाली आहे. त्याचा आनंद व्यक्त करतांना शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. ती सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, चौथीपासून तिने पाहिलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून, माझं आजारपण, कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत. बॅकेचं कर्ज काढून, कोणतीही सवलत, आरक्षण नसताना केवळ मेहनत, बुध्दिमत्ता, परिश्रम व निष्ठा या जोरावर ती पायलट झाली. बापाला आणखी काय हव, नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी. मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे. करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा.
शरद पोंक्षे हे प्रतिभावंत कलाकार म्हणून ओळखले जातात. नाट्यसृष्टी बरोबरच चित्रपट सृष्टीतही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विनोदी, गंभीर, नायक, खलनायक तसेच अतिशय संवेदनात्मक अशा सर्व विविध भूमिका त्यांनी यशस्वारित्या साकारल्या आहे. त्यांना कॅन्सर झाल्यानंतर त्यांची अभिनय कारकीर्द जवळपास संपुष्टात आली. कॅन्सरच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर, त्या रोगातून बाहेर पडल्यावर ते व्याख्याने देऊ लागले. त्यानंतर त्यांच्या अभिनलयाला पुन्हा बहर आला.
शरद पोंक्षे यांचे इयत्ता सहावीपर्यंतचे शालेय शिक्षण मिरज येथे आजोळी झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईत आले. येथे अभिनव विद्या मंदिर येथील शाळेत त्यांनी पुढील शालेय शिक्षण केले. त्यानंतर इयत्ता बारावीनंतर त्यांनी तीन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम केला. त्यानंतर ते बेस्टमध्ये नोकरीला लागले. १९८८ साली दे टाळी या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेद्वारे त्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. १९८९ साली वरून सगळे सारखे या नाटकातील भूमिकेद्वारे त्यांचा व्यावसायिक रंगमंचावर प्रवेश झाला. त्यांच्या नाट्यकारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक मात्र सर्वत्र गाजले. असा संघर्षमय प्रवास असलेल्या शरद पोंक्षे यांची मुलगी सिध्दी पायलट झाली. त्यामुळे त्यांच्यासाठी या प्रवासातला आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे त्यांनी भावनिक पोस्ट केली. पण, त्यातही त्यांनी बरंच काही सांगितलं.
पोंक्षेंनी माफी मागावी – अध्यक्षांची मागणी (व्हिडिओ)