मुंबई – पुत्र आर्यन खानला तब्बल २५ दिवसांनंतर जामीन मिळाल्याने अभिनेता शाहरुख खानचा जीव भांड्यात पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत आर्यन खानसह त्याच्या दोन मित्रांना जामीन मंजूर केला आहे. यासाठी शाहरुखने तीन दिग्गज वकीलांची फौज न्यायालयात उभी केली होती. त्यात ज्येष्ठ अॅड विधीज्ञ मुकुल रोहतगी, अॅड अमित देसाई, अॅड सतीश मानशिंदे यांनी भक्कम युक्तीवाद केला. त्यामुळेच आर्यनला जामीन मंजूर झाला आहे. याची दखल घेत अभिनेता शाहरुखने तातडीने वकीलांची भेट घेतली. या सर्वांचे त्याने आभार मानले. या विधीज्ञांमुळेच आर्यनची दिवाळी तुरुंगाऐवजी घरात साजरी होणार आहे.
Shah Rukh Khan poses with Senior Advocate Amit Desai, Advocate Satish Maneshinde and the legal team of his son #AryanKhan, who was granted bail by the Bombay High Court today.#AryanKhanBail #AryanKhanCase @iamsrk pic.twitter.com/t5C92JwpXQ
— Live Law (@LiveLawIndia) October 28, 2021