मुंबई – बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याने त्याचा पुत्र आर्यन खानची आज सकाळ आर्थर रोड तुरुंगात भेट घेतली. क्रूझ ड्रग प्रकरणी आर्यन सध्या तुरुंगात आहे. त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. याप्रकरणी आता थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आर्यनच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आर्यनच्या विरोधात न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले आहेत. त्यामुळेच आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. गेल्या आठवड्याभरापासून आर्यन तुरुंगात आहे. त्याला भेटण्यासाठी शाहरुख प्रथमच तुरुंगात आला. या भेटीत त्याने आर्यनला दिलासा दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच, उच्च न्यायालयात जामीन मिळेल, अशी खात्रीही त्याने आर्यनला दिल्याचे बोलले जात आहे.
https://twitter.com/ANI/status/1451039055945166858