विशेष प्रतिनिधी, मुंबई
प्रसिद्ध चित्रपट अभिनेता शाहीद कपूर याची पत्नी मीरा राजपूत चित्रपटापासून दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते. मीराची फॅन फॉलोइंग कोणत्याही चित्रपट अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीय. सोशल मीडियावरही ती प्रसिद्ध आहे. परंतु सध्या तिच्याबाबत वेगळीच चर्चा आहे. तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये तिने केलेल्या ऑनलाइन शॉपिंगबाबत सांगितले आहे.
मीराने आपल्या मोबाईलसाठी ऑनलाइन कव्हर मागविले होते. परंतु या खेरदीत तिची फसवणूक झाली आहे. तिने फोन कव्हरचा फोटो शेअर केला आहे. ती सांगते, वर्कआउट करताना मदत होईल या अपेक्षेने तिने एक स्लिंग केस मागविली होती. एका मूर्ख जाहिरातीत मी फसले आणि फोन कव्हर खरेदी केले. ती वस्तू जाहिरातीत डिस्प्ले केल्याप्रमाणे अजिबातच नव्हती. एक तकलादू प्लॅस्टिक खरेदी केले. बॅग न घेऊन जाता मला कुठेही जाण्यासाठी एका स्लिंग कव्हरची गरज होती. माझी फसवणूक होऊन किती वर्ष लोटले असतील.










