इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शाहीर शेखची पत्नी आणि कुटुंबीयांना एका वेगळ्याच प्रसंगाला बुधवारी तोंड द्यावे लागले. शाहीरची पत्नी रुचिका तिच्या माहेरी राहायला गेली होती. त्याच इमारतीला बुधवारी मध्यरात्री आग लागली. त्यावेळी घरात रुचिकासोबत तिची १६ महिन्यांची मुलगी, आई आणि व्हीलचेअरवर बाबा होते. या घटनेनंतर शाहीरची पत्नी रुचिका हिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याची माहिती दिली.
छोट्या पडद्यावरील मोठा स्टार शहीर शेखची पत्नी रुचिका कपूर आणि त्यांची १६ महिन्यांची मुलगी एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. रुचिका राहत असलेल्या इमारतीला बुधवारी मध्यरात्री आग लागली. ती तिच्या मुलीसोबत आई – वडिलांच्या घरी राहते. त्याच इमारतीला आग लागली होती. रुचिकाचे वडील व्हीलचेअरवर असल्याने त्यांनाही काही करता येत नव्हते, परिणामी हे तिघेही इमारतीत अडकले होते. वडील व्हिलचेअरवर असल्याने तिला मुलगी अनायासह १५ फ्लोअर खाली उतरणं एकटीला शक्य नव्हतं. तेव्हा अभिनेता शहीर शेख त्यांच्या मदतीला धावून गेला.
रुचिकाने अशा कठीण परिस्थितीत घाबरुन न जाता प्रसंगावधान राखत शहीरला कॉल केला. इमारतीला आग लागल्याचे तिने शाहीरला सांगितले. याबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. हा संपूर्ण प्रसंग तिने यात वर्णन करून सांगितला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये रुचिकाने म्हणते की, ‘रात्री १.३० वाजता आम्हाला आमच्या इमारतीमध्ये आग लागली आहे, असे सांगणारा कॉल आला. जेव्हा आम्ही मुख्य दरवाजा उघडला तेव्हा मोठ्या प्रमाणात काळा धूर येत होता. आम्हाला बाहेर पडणेही कठीण झाले होते. तिथेच थांबावं लागेल, हे लक्षात आलं पण किती वेळ ते माहीत नव्हतं. पण, मुलीची काळजी असल्याने मी पॅनिक न होता काय घडलं हे सांगण्यासाठी शहीरला फोन केला.
‘माझे वडील व्हिलचेअरवर आहेत आणि माझं बाळ अवघ्या १६ महिन्यांचं. मला समजलं की तिथून बाहेर पडणं कठीण होतं. लोक बाहेर पडण्यासाठी घाई करा, असं सांगत होते. पण १५ माळे उतरणं कठीण होतं. धूर आत येऊ नये यासाठी आम्ही ओला टॉवेल दरवाज्याखाली लावला होता, पण धूर वेगाने आत शिरत होता.’
अग्निशमन दलाचे जवान वाचवायला येण्यापूर्वी काय केलं याविषयी रुचिका सांगते, शहीर आणि इतर काही लोक इमारतीतील गाड्या हटवण्याचे काम करत होते, जेणेकरून अग्निशामक दलाच्या गाड्यांना जागा होईल. रुचिकाने पुढे म्हटले की, ‘मला माझ्या शेजाऱ्यांनी फोन करून सांगितले की, अग्निशमन यंत्रणा घेऊन शहीर धावत पुढे गेले आणि त्याने अग्निशमन दल येण्यापूर्वी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन यंत्रणा आली. शेवटी ३.३० वाजता शहीर, रुचिकाचा दीर आणि ४ फायर फायटर तिच्यापर्यंत पोहोचले. अशी परिस्थिती कदाचित पहिल्यांदाच आली होती.
आधी आम्ही आई आणि मुलगी अनायाला बाहेर काढले. त्यानंतर शहीर आणि दीराने माझ्या वडिलांना व्हिलचेअरवरुन उचलून घेत १५व्या मजल्यावरुन खाली नेले. तोपर्यंत पहाटेचे ५ वाजले होते. ज्यांनी आम्हाला वाचवले त्या सर्व अग्निशमन दलाची मी आभारी आहे. मला याचा आनंद आहे की, अनाया आणि मी हा वीकेंड आमच्या पालकांसोबत घालवण्याचा निर्णय घेतला होता. कारण हा विचार करूनही भीती वाटते की आम्ही नसतो तर काय झालं असतं. शहीरने आमच्यासाठी जे केले ते एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे होते’. या पोस्टमध्ये रुचिकाने अग्निशामक दलाच्या जवानांचे आभार मानले.
त्याचसोबत आगीची अशी घटना घडल्यास कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हेसुद्धा तिने सांगितलं आहे. शहीर शेखनेही त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत. त्याने लांबलचक पोस्ट शेअर करत आगीपासून इमारतीतील लोकांना वाचवणाऱ्या फायर फायटर्सचा फोटोही शेअर केला आहे.
रुचिकाच्या पोस्टनंतर अनेक कलाकारांनी तिची विचारपूस केली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टवर बॉलिवूड तसंच टेलिव्हिजन विश्वातील दिग्गजांनी कमेंट करत शहीर आणि रुचिकाची विचारपूस केली आहे. कंगना रणौत, सोनम कपूर, आयुष्मान खुराना, अनिता हसनंदानी, अर्जुन बिजलानी, क्रिस्टल डिसुझा, हुमा कुरेशी या कलाकारांनी रुचिकाच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. ही घटना अत्यंत भीतीदायक असल्याचे म्हणत त्यांनी रुचिकाला धीर देण्याचा प्रयत्न केला.
Actor Shaheer Sheikh Save Wife and Girl Building Fire