इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सेलेब्रिटी म्हटलं की चाहते हे तर अत्यंत महत्त्वाचे. आपल्याला फॉलो करणारे आणि प्रत्येक गोष्टीची अपडेट ठेवणारे चाहते कोणाला नको असतात? थोडक्यात, सेलिब्रिटींच्या आयुष्यात चाहत्यांना देखील महत्त्व असतेच. हे चाहते सेलिब्रिटींना कायम फॉलो करत असतात. एखाद्या चांगल्या गोष्टीवर ते जसे कौतुक करतात तसे चुकल्यावर कान देखील उपटतात. सध्या मात्र अशाच दोन सुपरस्टार्सच्या चाहत्यांमध्ये जुंपल्याचे दिसते आहे.
झाले असे की देशातील दोन मोठे सुपरस्टार – अभिनेता शाहरुख खान आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्यात चांगली मैत्री आहे. पण त्यांच्या चाहत्यांमध्ये सध्या मतभेद निर्माण झाले आहेत. दोन दिवसांपासून शाहरुख आणि विराटचे चाहते ट्विटरवर एकमेकांविरोधात ट्विट करत आहेत. दोघांच्याही मते आपला स्टार बेस्ट आहे. दोघांची फॅन आर्मी आपल्या आवडत्या स्टारला बेस्ट म्हणण्यावर भर देताना दिसत आहे. काहीजण शाहरुख खानच्या अभिनयाबद्दल आणि त्याच्या जगभरातील प्रसिद्धीबद्दल बोलत आहेत, तर काहीजण विराट कोहलीच्या स्टारडम आणि इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सचा हवाला देत त्याला शाहरुखपेक्षा मोठा स्टार म्हणत आहेत. ट्विटरवर सुरू असलेल्या या फॅन युद्धात ट्रेंडमध्ये अनेक चाहते वादग्रस्त ट्विटही करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर सुरू असलेल्या या वादात शाहरुख खानच्या एका चाहत्याने लिहिले, “प्रत्येकजण शाहरुखची इतरांशी तुलना का करतो? शाहरुख Vs बॉलीवूड, दक्षिणात्य कलाकार, राजकारणी, क्रिकेटर्स….. सर्वांशी त्याची तुलना का होते, कारण तो सर्वोत्कृष्ट आहे हे सर्वांना माहीत आहे.” तर शाहरुखने कोहलीबद्दल केलेल्या एका ट्विटचा स्क्रीन शॉट शेअर करत विराटच्या एका चाहत्याने उत्तर दिले, “शाहरुखचे सर्वात जास्त आवडलेले ट्विट विराट कोहलीबद्दल होते. विराट कोहली, सर्वात बेस्ट शाहरुख खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा स्टार आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्याची फॅन फॉलोइंग देशातच नाही तर जगभरात आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाने जगभरातील सर्व विक्रम मोडले आणि सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. पण काहींनी त्याचा अवमान करण्याचा प्रयत्न केला. तर काहींना विराटलाही ट्रोल केले.
ट्विटरवर सुरू असलेल्या या वादामध्ये काहींनी सामंजस्याची भूमिका घेत शांततेचे आवाहन केले आहे. एकजण म्हणतो, “कोणाचाही अपमान करण्याचा हेतू ठेवू नका. विराट कोहली आणि शाहरुख खान हे दोघेही भारताची शान आहेत. दोघेही जगात देशाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे ही बालिश भांडणे थांबवा.”
विराट कोहलीने आतापर्यंत कसोटी, एकदिवसीय आणि टी २० मध्ये ७१ शतके झळकावली आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे २४२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर शाहरुख तीन दशकांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे आणि इंस्टाग्रामवर त्याचे ३७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
Actor Shah Rukh Khan Cricketer Virat Kohli Fans Clash